For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फ्लॅटचे कुलुप तोडून पावणेदोन लाखाचा ऐवज लंपास

01:20 PM Jun 19, 2024 IST | Abhijeet Khandekar
फ्लॅटचे कुलुप तोडून पावणेदोन लाखाचा ऐवज लंपास
crime
Advertisement

सांगली शहरातील कर्नाळ पोलीस चौकीजवळील प्रकार: सांगली शहर पोलीस ठाण्यात नोंद

सांगली प्रतिनिधी

सांगली शहरातील कर्नाळ चौकातील वसंत पेट्रोलियमजवळ असणाऱ्या बंद फ्लॅटचे कुलुप तोडून फ्लॅटमधील एक लाख 62 हजाराचा ऐवज लंपास केला आहे. यामध्ये सोन्याची बोरमाळ, रिंगा, टॉप्स, मण्यांची माळ व चांदीचे दागिने लंपास केले आहे. ही घरफोडी सोमवारी सकाळी 11 ते सहाच्या सुमारास झाली आहे. याबाबत इम्रान फकीरमहंमद कसाब वय 40 रा. कर्नाळ रोड सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी की, इम्रान कसाब हे सोमवारी सकाळी अकरा वाजता फ्लॅटचा दरवाजा बंद करून बाहेर पडले होते. त्यानंतर त्याच्या फ्लॅटचा दरवाजा तोडून बेडरूममध्ये असणाऱ्या लोखंडी कपाटात ठेवण्यात आलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 62 हजाराचा ऐवज लंपास केला आहे. संध्याकाळी सहा वाजता ते फ्लॅटवर आल्यावर त्यांना या घरफोडीची माहिती समजली त्यांनी तात्काळ सांगली शहर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार सांगली शहर पोलीसांनी तात्काळ तपास सुरू करून या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.