For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Breaking : भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या प्रेमी युगुलाची आत्महत्या; घटनेने एकच खळबळ

04:30 PM Jun 21, 2024 IST | Abhijeet Khandekar
sangli breaking   भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या प्रेमी युगुलाची आत्महत्या  घटनेने एकच खळबळ
Miraj Arag Suicide couple
Advertisement

आरग (ता. मिरज) येथे भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या तरुण- तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सदर घटना गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. यामध्ये आकाश पोपट कोळी (वय २५), तर समृध्दी बबन कोळी (वय २३, दोघे रा. बहादूरवाडी भवानीनगर ता. वाळवा) असे आत्महत्या केलेल्या तरुण तरुणीचे नाव आहे.

Advertisement

याबाबत घटना स्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, आकाश पोपट कोळी आणि समृध्दी बबन कोळी हे दोघे तरुण- तरुणी आरग येथील गणपती मंदिराजवळील नाईक वस्तीवर दहा दिवसापूर्वी भाड्याच्या खोलीमध्ये राहण्यासाठी आले होते. दरम्यान, आकाश कोळी हा गुरुवारी सायंकाळी बाहेर गेला असता समृद्धी कोळी हिने प्रथम ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर प्रकार आकाश याला घरी आल्यानंतर समजल्याने आकाशाने समृद्धीचा मृतदेह खाली उतरून स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि मिरज उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक प्रनिल गिल्डा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून पंचनामाचे काम सुरू होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.