For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

४१ लाखांच्या खंडणीसाठी दोघा युवकांचे अपहरण; कर्नाटकातील तिघांविरोधात गुन्हा दाखल

09:49 PM Oct 29, 2023 IST | Abhijeet Khandekar
४१ लाखांच्या खंडणीसाठी दोघा युवकांचे अपहरण  कर्नाटकातील तिघांविरोधात गुन्हा दाखल
Advertisement

जत, प्रतिनिधी

जत तालुक्यातील अचकनहळळी येथील दोघा युवकांचे जबरदस्तीने अपहरण करुन नेऊन १०-१२ दिवस कोंडून ठेवून त्यांना सोडविण्यासाठी ४१ लाख रुपयांची खंडणीची मागणी केली असल्याची फिर्याद सुनिल गणपती बंडगर यांनी जत पोलीस ठाण्यात दिली आहे. याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात कर्नाटकातील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

संशयित आरोपी लक्ष्मण करपे व बुदू करपे (रा. कुंन्नूर, कर्नाटक) या दोघांनी सुनील यांच्या एक मुलगा धानाप्पा सुनिल बंडगर याचे अपहरण करून 16 लाखाची मागणी केली. तर तिसरा आरोपी आंदू खरात (रा. लिबाळवाडा, कर्नाटक) याने १९ ऑक्टोंबर रोजी दुसरा मुलगा प्रवीण बंडगर यास अपहरण करून २५ लाखाची मागणी केली आहे. याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात दोघा मुलाचे वडील सुनिल गणपती बंडगर यांनी शनिवारी फिर्याद दिली आहे. अपहरण झालेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी जत पोलिसांचे पथक कर्नाटकात पाठविण्यात आले आहे.

रम्यान, रविवारी उशिरा आरोपींना ताब्यात घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. मात्र अधिकृत माहिती आल्याशिवाय किंवा समोर अटक रजिस्टरला माहिती आल्याशिवाय काही सांगू शकत नाही, असे जत पोलिसांकडून सांगण्यात आले. तसेच या अपहरणामागे नेमके कारण काय हे देखील अद्याप समजू शकले नाही.

Advertisement

Advertisement
Tags :

.