महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून कडेगाव येथे तिघांवर खुनी हल्ला

11:06 AM Jul 13, 2024 IST | Abhijeet Khandekar
Sangli Kadegoan Murderous attack
Advertisement

6 जणांविरूद्ध गुन्हा : धारदार शस्त्रांचा वापर

कडेगांव प्रतिनिधी

मटका व्यवसायासाठी दिलेल्या पैशाचे व्याज आणि मुद्दल रक्कम परत न दिल्यामुळे खाजगी सावकारी करणाऱ्या टोळीने कडेगांव येथील तीन युवकांवर लोखंडी रॉड, तलवार व गुन्हे गंभीर जखमी करत बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली आहे. याप्रकरणी खाजगी सावकार सुधीर प्रकाश फडतरे, शुभम जितेंद्र यादव, शुभम सुहास यादव, रा. कडेपूर राहुल मोहन रा.कडेगांव राम उर्फ आशुतोष मदने, सुरज मोहिते रा. हिंगणगाव खुर्द या 6 जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी की ही घटना सोमवार दिनांक 8 जुलै रोजी दुपारी 2 च्या सुमारास कडेगाव शहरातील कराड विटा महामार्गालगत 8 जुलै रोजी दुपारी 2 वाजता घडली. यावेळी अरबाज अस्लम तांबोळी यांचे वडील अस्लम तांबोळी यांना कडेपूर येथील खाजगी सावकार व मटका व्यावसायिक सुधीर फडतरे यांनी स्वत:चा मटका व्यवसाय चालवण्यासाठी 01 लाख रूपये दिले होते. अस्लम तांबोळी यांनी मटक्याचा धंदा बंद केल्या नंतर मटक्या व्यवसायातील 90 हजार देणे बाकी होते. त्या मुद्दलीचे मासिक व्याज अस्लम तांबोळी हे प्रत्येक महिन्याला देत होते. दोन ते तीन महिन्याचे व्याज न दिल्यामुळे खाजगी सावकार सुधीर फडतरे यांनी आपल्या साथीदारांसह अरबाज तांबोळी याला सोमावरी कडेगाव येथील स्टँड चौकामध्ये मारहाण केली होती. त्याची तक्रार देण्यासाठी अरबाज तांबोळी व असलम तांबोळी हे पोलीस स्टेशनमध्ये गेले असता.

Advertisement

अरबाज याचा लहान भाऊ कराड विटा रोडवरील साई चाईनीज समोर आपल्या मित्रांसोबत बसला होता. तुझ्या वडिलांना व भावाला माझ्या विरोधात खाजगी सावकारी व मटक्याची तक्रार मागे घ्यायला सांग नाहीं तर त्यांना सोडणार नाहीं अशी धमकी दिली. आरबाज त्यांची समजूत काढत असताना सुधीर फडतरे यांच्या थार गाडीतील ठेवलेल्या तलवार, गुप्ती, व लोखंडी रॉडने सुधीर फडतरे यांचे साथीदार राहुल याने तलवारीने सोहेल मोहीद्दीन मुला याचे उजव्या हाताचे पोटरीवर मारून जखमी केले वजय उर्फबबलु शिवाजी पवार यांच्या डावे हाताचे कोपराजवळ अशुतोष मदने याने गुप्तीने मारून जखमी केले, विजय शुभम यादव याने लोखंडी रॉडने निहाल अस्लम तांबोळी याचे पाठीवर माऊन जखमी केले तसेच सुधीर फडतरे याने शुभम यादव याचे कडुन लोखंडी रॉड घेवुन निहाल याचे बरगडी व मांडी वर मारहाण कऊन गंभीर जखमी केले तसेच जिल्हाधिकारी यांचे बंदी आदेशाचे उलंघन केले आहे

 

Advertisement
Tags :
Kadegaon for paymentMurderous attackSangli Kadegoantarun bharat news
Next Article