For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी जतमध्ये आमरण उपोषण; आरक्षण समिती आदेशाची होळी

06:04 PM Nov 28, 2023 IST | Abhijeet Khandekar
धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी जतमध्ये आमरण उपोषण  आरक्षण समिती आदेशाची होळी
Dhangar reservation
Advertisement

जत, प्रतिनिधी

धनगर समाजाच्या एस टी आरक्षण अंमलबजावणीचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठवून अंमलबावणी करावी, राजे यशवंतराव होळकर घरकुल योजना व पु.अहिल्यादेवी होळकर महामेष योजनेच्या लाभार्थ्यांना निधी त्वरित वितरण करावे,घोषणा केलेल्या निधीची तरतूद करावी,समाजाच्या प्रश्नावर आंदोलन केलेल्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत, आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या बिरू खर्जे कुटुंबीयांना 25 लाख तत्काळ मदत द्यावी या मागण्यासाठी जत तहसील कार्यालयासमोर दोन दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

Advertisement

या उपोषणाला दुसऱ्या दिवशी तुकाराम महाराज आणि धनगर समाजाच्या बांधवानी पाठिंबा दिला. आंदोलनस्थळी दुसऱ्या दिवशी राज्य सरकारने धनगर आरक्षणासाठी नेमलेल्या समितीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.

यावेळी युवा नेते विक्रम ढोणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महादेव पाटील, शंकर वगरे, मार्केट कमिटी संचालक बाबासाहेब माळी,तुकाराम माळी ,सलीम गंवडी,रमेश माळी, दिनकर पतंगे, प्रवीण शेठ गडदे ,अन्नप्पा कंदे, तायाप्पा वाघमोडे, पापा हुजरे, रमेश माळी, सागर शिनगारे, तेजस्विनी व्हनमाने, युवराज माने, योगेश एडके, राजू लोखंडे, आमसिध शेंडगे, बाळू पांढरे,भीमराव खरात,शरद सरगर,विठ्ठल पुजारी,पिंटू माने, संतोष सलगरे, कृष्णा गुरव, विकास लेंगरे आंदोलनात सहभागी होत पाठिंबा दिला.

Advertisement

Advertisement
Tags :

.