भूगर्भातील गूढ आवाजाने जत पूर्वभाग पुन्हा हादरला
भूकंपाची शक्यता नसल्याने लोकांनी घाबरू नये : भूवैज्ञानिकांचे आवाहन
सोन्याळ वार्ताहर
भूगर्भातून पुन्हा गूढ आवाज येऊ लागल्याने जत पूर्वभाग हादरला आहे. गेल्या आठवडयात असाच आवाज येत होता. त्यानंतर मंगळवारी पुन्हा आवाज आल्याने नागरिकांतून घबराटीचे वातावरण पसरले आहे. अफवा आणि चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान नागरिकांच्या तक्रारीवरून मंगळवारी भूवैज्ञानिकांचे पथक जत पूर्व भागात ठाण मांडून होते.
याबाबत माहिती अशी, जत पूर्व भागातील उटगी, उमदी, संख आदी भागात मंगळवारी सकाळी लवकर खूप मोठा गूढ आवाज आला. भूगर्भात हालचाल झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली. गेल्या आठवड्यात भूगर्भातून असाच मोठा आवाज आला होता. आज पुन्हा मोठा आवाज झाल्याने नागा†रकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. भूकंप झाल्याची चर्चाही होती. या आवाजाचे गूढ उकलण्यासाठी ा†जल्हा प्रशासनाने एक तज्ञ शास्त्रज्ञाचे पथक उटगी, उमदी संख या भागात पाठवले आहे.
या पथकाकडून गूढ आवाजाची मा†हती घेऊन तपास करण्यात सुरू होता. दिवसभर पथकातील वैज्ञानिक आणि अधिकाऱ्यांनी आवाज आलेल्या भागातील नागरिकांच्या भेटी घेतल्या माहिती घेतली. तसेच भूगर्भाचाही अभ्यास केल्यानंतर या परिसरात भूकंपाची नोंद झाली नसल्याच्या निष्कर्षापर्यंत पथकातील अधिकारी पोहोचले. पण आवाजाबाबत लवकरच खुलासा करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
भूकंपाच्या नोंदी नाहीत, लवकरच उकल होईल : जिरंगे
भूगर्भातून येणाऱ्या आवाजाने लोकांनी अफवांवर विश्वास ठेऊन घाबरू नये, या भागात भूकंपाच्या नोंदी झालेल्या नाहीत. तथापि नागरिकांच्या सांगण्यावरून भूगर्भातून नेमका आवाज कशाचा येतोय याची लवकरच उकल होईल, अशी माहिती वरिष्ठ सांगली भूजल विभागातील वरिष्ठ भूवैज्ञानिक अमित जिरंगे यांनी तरूण भारतशी बोलताना दिली. जिरंगे म्हणाले, भूगर्भातून पहाटेच्या सुमारास आवाज येत असल्याची माहिती नागरिकांनी दिली. त्या अनुशंगाने भूवैज्ञानिकांच्या पथकाकडून पाहणी करण्यात आली. या परिसरात भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद नाही. परंतु आवाजाचे गूढ उकलण्याचा प्रयत्न सुरू आहे. विविध बाबींचा अभ्यास करण्यात येत आहे. येत्या एक दोन दिवसात याबाबत खुलासा होईल.