मिरज तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस! शेतीमशागतींना वेग येणार
म्हैसाळ वार्ताहर
म्हैसाळसह मिरज तालुक्यातील ढवळी, नरवाड, विजयनगर कर्नाटकातील कागवाड, शेडबाळ या ठिकाणी आज दुपारी चांगलाच पाऊस झाला. वळिवाच्या या पावसाने उष्म्याने हैराण झालेल्या मिरजकरांना थोडा गारवा जाणवला. या पावसामुळे शेतीकरी चांगलाच सुखावला आहे.
आज सायंकाळी सव्वापाच ते सहा चे दरम्यान विजेच्या कडकडाट मुसळधार पाऊस पडला.सुमारे पाऊन तास पडलेल्या पावसामुळे सर्वत्र पाणी च पाणी झाले. दिवसभर उष्म्याने हैराण झालेल्या ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मशागती केलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून पाणी टंचाईने तहानलेल्या पिकांना आधार मिळाला तर कमी अधिक प्रमाणात नाल्यामध्ये पाणी आल्याने ऐन उन्हाळ्यात विहीर व कूपनलिकांच्या पाणी पातळीत घट झाली होती. आता किमान पाणी पातळीत वाढ होणार आहे. दमदार पावसा अभावी खोळंबलेल्या शेती मशागतीना आता वेग येणार आहे. एकंदर बऱ्याच दिवसांनी मे महिन्यात वळीवाचा पाऊस चांगला झाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.