गोकुळनगर- भीमनगरजवळ एकावर चाकूने हल्ला
विश्रामबाग पोलीस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल
सांगली प्रतिनिधी
विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गोकुळनगर-भीमनगर येथे एकावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. हा प्रकार रविवारी दुपारी घडला. याप्रकरणी जखमी रवींद्र पाटील रा. टिंबर एरिया स्वास्तिक काट्याजवळ सांगली यांने तिघांविरूध्द विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्यामध्ये अविनाश काटे, सोन्या रणदिवे आणि आऱ्या, पुर्ण नाव माहित नाही हे तिघेही राहणार नवीन वसाहत सांगली याचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादी रवींद्र पाटील आणि त्याचा मित्र गोकुळनगर येथे बँजोचे गाणे ऐकत उभे होते. त्याचवेळी तेथील तिघांना वाटले की रवींद्र पाटील यांने हे गाणे बंद करायला सांगितले आहे. या संशयातून तिघांनी येवून पाटील याच्यावर चाकूने हल्ला केला तसेच त्याला सोडवण्यासाठी आलेल्या मित्रालाही मारहाण केली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात या तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.