गुन्हा दाखल करण्याची धमकी देत वृध्दाची फसवणूक! मुंबई पोलीस ठाण्याच्या नावाने केला फोन
या गुन्हयातून सुटण्यासाठी सात लाख पाठविण्याचा केला आदेश
सांगली प्रतिनिधी
तुमच्या नांवावर सिमकार्ड कागदपत्रे वापरून दुसरे सिमकार्ड घेवून ते सिमकार्ड लोकांना फसवून त्यांच्याकडून पैसे काढण्यासाठी व मनी लॉंडरींग करीता वापरत आहे. तुम्ही लोकांना फसवत आहात व देशविरोधी संदेश पाठवित आहात. म्हणून तुमच्याविरूध्द टिळकनगर पोलीस स्टेशन, मुंबई येथे एफआयआर दर्ज केला आहे. असे सांगून सांगलीतील वृध्दाची सात लाखाची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी अरविंद गंगाधर किलेदार, वय 85 वर्षे, रा. प्लॉट नं. 22, त्रिमुर्ती बंगलो, माऊती मंदिराजवळ, गर्व्हमेंट कॉलनी, विश्रामबाग, सांगली. त्यांनी अज्ञाताविरूध्द विश्रामबाग पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अरविंद किल्लेदार हे पूर्वी वेगवेगळ्या कंपनीमध्ये नोकरी करत होते. सध्या ते निवृत्त झाले आहेत. एक जुलै रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांच्या मोबाईल क्रमांकावर अज्ञातांचा फोन आला. त्याने आपण रवी कुमार गर्व्हमेंट कन्सलटंट ऑफिसर टोलफोन ऑफिस, मुंबई बंच बोलतो असे सांगून त्याने तुमच्या नांवावर सिमकार्ड कागदपत्रे वापरून दुसरे सिमकार्ड घेवून ते सिमकार्ड लोकांना फसवून त्यांच्याकडून पैसे काढण्यासाठी व मनी लॉंडरींग करीता वापरत आहे. तुम्ही लोकांना फसवत आहात व देश विरोधी संदेश पाठवित आहात. म्हणून तुमच्या विरूध्द टिळकनगर पोलीस स्टेशन, मुंबई येथे एफआयआर दाखल केला आहे. तसेच त्याचा नंबर एम.एच.1405/624 असा आहे. असे सांगून त्याने टिळकनगर पोलीस स्टेशनमधील वरिष्ठ साहेबांना जोडून देतो असे सांगून फोन बंद केला. त्यानंतर दुसऱ्या मोबाईलवरून त्यांना पुन्हा फोन आला. त्यावेळी समोरील व्यक्ती ही मी टिळकनगर- मुंबई पोलीस ठाण्यातून बोलतो असे सांगून त्याने तुम्ही दोन तासात टिळकनगर पोलीस स्टेशनला या. तुमच्याविरूध्द भरपूर लोकांनी पोलीस स्टेशनला तक्रारी दिलेल्या आहेत, अशी धमकी दिली.
त्यावेळी त्यास किल्लेदार यांनी मी वयोवृध्द असून सांगली येथे राहणेस आहे. इथून मुंबई खुप लांब आहे. मला येणे शक्य नाही, असे सांगितले. त्यावेळी समोरील अधिकाऱ्यांने माहिती काढून घेवून तुम्ही गुन्हा केलेला नाही, तुमच्या नावाचा वापर करून गुन्हा करणाऱ्याला पकडू. त्यासाठी एका बँक खात्यावर पैसे पाठवून द्या, असे सांगितले. त्यावेळी त्यांने आताच्या आता सात लाख रूपये एमवायके एन्टरप्राईजेस नावाचे एस.बी.आय शाखा रामपुर गार्डन मधील खाते क्र. 43084045058 हे देवून त्यावर लवकरात लवकर सात लाख ऊपये आर.टी.जी.एस. करणेस सांगितले. त्याचे सांगणेप्रमाणे त्याच्या खात्यावर पैसे पाठा†वले. त्यानंतर ही माहिती कुटुंबियांना सांगितल्यावर ही फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.