Sangli News : राज्यातील पूरग्रस्तांसाठी सांगली जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांचा मदतीचा हात
कर्मचाऱ्याच्या पगारातून मदत करणारी सांगली जिल्हा बँक राज्यातील एकमेव बँक
सांगली : राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीने सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन दिले आहे. बँकेतील १ हजार ५० कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या वेतनाचे १७ लाख २२ हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी वर्ग करण्यात आले आहे. अशा प्रकारे बैंक कर्मचाऱ्याच्या पगारातून मदत करणारी सांगली जिल्हा बँक राज्यातील एकमेव आहे.
राज्यात मराठवाड्यासह काही भागात अतिवृष्टी होवून नद्याने पूर झाले. काही ठिकाणी ढगफुटीही झाली. यामुळे अनेकांचे संसार पाण्याखाली गेले. शेती, पिके बाहून गेली. या संकटात काही जणांना जीव गमावावा लागला. आपत्ती ग्रस्तांना मदतीसाठी राज्यभरातून ओघ सुरु झाला. यात सांगली जिल्हा बँकेनेही खारीचा वाटा उललला. जिल्हा बँकेच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक कोटी रुपयांची मदत दिली.
या मदतीशिवाय जिल्हा बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही आपला एक दिवसाचा पगार पूरग्रस्तांच्यामदतीसाठी देण्याच्या निर्णय घेतला. त्यानुसार बँकेतील एक हजार ५० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या एक दिवसाच्या वेतनाचे १७लाख २२ हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिले. राज्यातील अनेक सहकारी संस्था, साखर कारखाने, बँकांनी पूरग्रस्तांना मदत दिली. अशा प्रकारे मदत देण्यात सांगली जिल्हा बँक राज्यातील पहिलीच बँक ठरली आहे.