For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सांगलीतील चौघांचा लखनऊमधील अपघातामध्ये मृत्यु! उभ्या असणाऱ्या कंटेनरला चारचाकीची धडक

12:04 PM Jul 10, 2024 IST | Abhijeet Khandekar
सांगलीतील चौघांचा लखनऊमधील अपघातामध्ये मृत्यु  उभ्या असणाऱ्या कंटेनरला चारचाकीची धडक
Advertisement

मृतात सांगली जिल्ह्यातील दोघांचा तर कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश : एकजण गंभीर : मृतात एका महिलेचा समावेश

सांगली: तासगाव तालुक्यातील मयत हमजेखान अत्तार याचा फोटो नावाने सेव्ह आहे

Advertisement

सांगली प्रतिनिधी

उत्तरप्रदेशातील लखनऊ येथे रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला मागून चारचाकीने जोरदार धडक दिली. या धडकेत चारचाकी एमजी हेक्टर वाहनातील चौघे ठार झाले. तर एकजण गंभीर जखमी आहे. ही धडक इतकी मोठी होती की वाहनांचा चक्काचूर झाला आहे. हा अपघात सोमवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान लखनऊपासून 40 किमीवरवर झाला. ठार झालेल्यामध्ये सांगली जिल्ह्यातील दोघांचा तर कोल्हापूर जिल्ह्यातील एक आणि सोलापूर जिल्हयातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर एकजण गंभीर जखमी आहे. पाचही जण कंपनीची बैठक आटोपून घरी परत असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी की, अपघातात मृत्यूमुखी पडलेले सर्वजण हे मोरल या कंपनीत कामाला होते. कंपनीच्या बैठकीसाठी ते लखनऊ येथे गेले होते. पुन्हा घरी परतत असताना हा जोरदार अपघात झाला आहे. या अपघातात मयत झालेल्यांची नावे अशी-हमजेखान अमीन अत्तार वय 58 रा. ढवळवेस, तासगाव, ा†दलदार मकबूल तांबोळी-65 रा. बांबवडे ा†ज. कोल्हापूर, सुनीता अर्जुन कदम 49 रा. ा†वजयनगर, सांगली, भगवान पवार रा. सांगोला, तर आ†नल पाटील, रा.ा†पशवी, ा†ज. कोल्हापूर,हे गंभीर जखमी झाले आहेत.

वरील सर्व मोरल कंपनीत कार्यरत होते चार दिवसापूर्वी एमजी हेक्टर या वाहनातून ते कंपनीच्या बैठकीसाठी लखनऊ येथे गेले होते. लखनऊ येथून बैठकीचे कामकाज आटोपून ते घरी परतत होते. लखनऊपासून सुमारे 40 ा†कलोमीटरवर ते आले असता, उभ्या असणाऱ्या एका मोठ्या कंटेनरला या एमजी हेक्टर वाहनाने मागून जोरदार धडक दिली. यात तासगाव येथील हमजेखान अत्तार, आणि सौ. सुनिता कदम व भगवान पवार हे जागीच ठार झाले तर ा†दलदार तांबोळी गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी जवळच्या एका ऊग्णालयात दाखल करण्यात आले तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना काही वेळाने त्यांचा मृत्यू झाला. तर आ†नल पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मात्र उपचार सुरू आहेत.

यातील मयत हमजेखान अत्तार यांचे मूळगाव तासगाव तालुक्यातील बोरगाव हे आहे. ते गेल्या सुमारे 25 वर्षापासून तासगाव येथे स्था†यक आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा पा†रवार आहे. सौ. सुनीता कदम या सांगलीतील विजयनगर येथील असून त्याही या अपघातात जागीच ठार झाल्या आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यातील बांबवडे येथील दिलदार तांबोळी आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील भगवान पवार यांचा मृत्यू झाला आहे. तर अनिल पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत. पण तेही गंभीर जखमी आहेत.

Advertisement
Tags :

.