गाडीने पाठीमागून जोराची धडक दिल्याने महिला जागीच ठार; अन्य दोघेजण गंभीर जखमी
कवठेमहांकाळ प्रतिनिधी
गोवा येथून पंढरपूर येथे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या वैगनआर गाडीला इनोवा क्रिस्टा या गाडीने पाठीमागून जोराची धडक दिल्याने एक महिला जागीच ठार झाली. तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. गौरी गुरूदास कुडताळकर, वय 60 वर्षे, (रा. अस्नोडा, ता. बार्देश, राज्य गोवा) असे मृत महिलेचे नाव आहे. तर कारचालक शाबाजी राजेंद्र गाड, वय 30 वर्षे रा.मुळगाव डिसोली, गोवा व सुरेखा शरोडकर, वय 60 वर्षे, (रा.फटरीवाडा रेवोडा बार्देश गोवा) अशी जखमींची नावे आहेत. तर इनोवा क्रिस्टा चालक हर्षित भास्कर पोरेड्डी (वय 24) रा गायत्री नगर हैदराबाद यास पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
ही घटना शुक्रवारी साडेदहाच्या दरम्यान रत्नागिरी नागपूर महामार्गावरील अलकुड (एम) गावच्या हद्दीतील रत्ना पंपाजवळ घडली. याबाबत पोलिसांच्या कडून मिळालेली अधिक माहिती अशी की, गौरी कुडाळकर या त्यांचे सहकारी गोवा येथून पंढरपूरकडे वैगनआर गाडीने (क्रं उA 03 भ् 6136) देवदर्शनासाठी पंढरपूर कडे निघाले होते. यावेळी अलकुड एम हद्दीतील रत्नापंपा समोर पाठीमागून येण्राया सहक्रायाची वाट बघत सर्वजण थांबले होते. यावेळी पाठीमागून येण्राया इनोवा क्रिस्टा(क्रं ऊए 07 व्थ 3339) गाडी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने व्हॅगनार गाडीला पाठीमागून जोराची धडक दिली.
या अपघातात गौरी कुडाळकर या जागीच मयत झाल्या तर त्यांचे दोन सहकारी गंभीर जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की वैगनआर गाडी दीडशे फूट फरफटत गेली. या अपघाताने सर्वत्र व्यक्त होत आहे. या अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी इनोवा क्रिस्टा चालक हर्षित भास्कर पोरेड्डी याच्या विरोधात कवठेमंकाळ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पद्माकर मधु वायगणकर यांनी कवठेमंकाळ पोलिसात फिर्याद दाखल केली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर करीत आहेत.