घटस्फोटाचा अर्ज केला म्हणून पत्नीसह दोघीवर चाकूहला: दोन्ही महिला जखमी: संशयितांवर गुन्हा
कुपवाड प्रतिनिधी
घटस्फोटाचा अर्ज का केला आहेस ? तो अर्ज माघारी घे, असे म्हणून रागातुन चिडून पतीने पत्नीसह अन्य एका महिलेवर चाकूहला केल्याचा प्रकार मिरज एमआयडीसी येथे घडला आहे. याबाबत कुपवाड पोलिसांत नोंद झाली आहे.
या हल्यात पत्नी पूजा राजेश शिंदे (वय ३१, सध्या रा. राजेंद्र फीडस इंडस्ट्रीज मिरज एमआयडीसी मूळ रा. बनेवाडी ता. कवठेमहांकाळ) व वैशाली रणदिवे या दोन महिला जखमी झाल्या आहेत. जखमी पत्नीने कुपवाड पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने पोलिसांनी संशयित पती राजेश शंकर शिंदे (वय 42,रा.बनेवाडी ता. कवठेमहांकाळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, फ़िर्यादी पूजा शिंदे व वैशाली रणदिवे या दोघी मिरज एमआयडीसीतील राजेंद्र फिडस इंडस्ट्रीज (प्लॉट नंबर 5) या कंपनीत राहतात. संशयित राजेश शिंदे यांनी त्यांच्या घरी येऊन ’तू मला घटस्फोटाचा अर्ज का केला आहेस, तो अर्ज माघारी घे’ असे म्हणून पूजा शिंदे व वैशाली रणदिवे या दोघीवर चाकू हला करून जखमी केले. त्यांच्यावर शासकीय ऊग्णालयात उपचार करण्यात आले. याबाबत पूजा शिंदे यांनी कुपवाड पा†लस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आ†धक तपास पोलिस करीत आहेत.