For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli : पोलीस मुख्यालयातून गाड्यांच्या स्पेअरची चोरी

02:56 PM Jun 06, 2024 IST | Abhijeet Khandekar
sangli   पोलीस मुख्यालयातून गाड्यांच्या स्पेअरची चोरी
Sangli Crime Theft
Advertisement

तीन संशयित महिलांना अटक : विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा

सांगली प्रतिनिधी

विश्रामबाग येथील पोलीस मुख्यालयामध्ये असणाऱ्या मोटार परिवहन विभागाजवळ लावण्यात आलेल्या जुन्या गाड्याचे स्पेअरपार्ट चोरी करताना तीन संशयित महिलांना अटक करण्यात आली. याप्रकरणी मोटार परिवहन विभागाचे पोलीस हवालदार रियाज मुजावर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी की, चार जूनच्या पहाटे साडेपाचच्या सुमारास पोलीस मुख्यालयातील या मोटार परिवहन विभागाजवळून तीन संशयित महिला जात असताना या विभागातील कर्मचाऱ्यांनी पाहिले त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी याठिकाणी असणाऱ्या चारचाकी गाडीचे दोन सिटकव्हर, मोटारसायकलचे मॅकवेलसह दोन टायर आणि मोटारसायकलची पेट्रोल टाकी, अॅल्युमिनिअमची तार अशी चोरी केल्याचे कबुली दिली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी संशयित म्हणून गीता अनिल कुचीकुरवी, मिरज, सुनीता भारत पवार रा. वडर कॉलनी, सांगली, राधा मार्तंड माळी रा. वडर कॉलनी सांगली या तिघींना अटक केली आहे. त्याच्याकडून हा माल जप्त करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.