जामीनावर सुटलेल्याकडून युवतीवर बलात्कार! कवठेएकंदच्या तरूणावर अॅट्रासिटीसह बलात्काराचा गुन्हा
व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
प्रतिनिधी सांगली
पिडीतेने दाखल केलेल्या गुन्ह्यातून जामीनावर सुटल्यानंतर संशयितांने पुन्हा पिडीतेवर लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. अश्लिल फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिने कोणाबरोबरही लग्न करू नये, आपल्याशीच लग्न करावे, यासाठी संशयिताने तिच्यावर दबाव आणून शिवीगाळ करत तिला बघून घेण्याची धमकी दिली आहे.
याप्रकरणी पिडीत तरूणीने सांगली शहर पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांनी संशयित मोईन सिराज नदाफ (रा. कवठेएकंद, ता. तासगाव) याच्याविरूध्द बलात्कार, विनयभंग आणि अॅट्रॉसिटी कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरज तालुक्यातील एका गावातील पिडीत तरूणीने संशयित मोईन नदाफ याच्याविरूध्द फिर्याद दिली आहे. पिडीतेच्या दुबळेपणाचा फायदा उठवून संशयिताने पिडीतेला आपल्या जाळ्यात ओढले. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तिने मिरज ग्रामीण पोलिसांत त्याच्याविरूध्द फिर्याद दिली.
त्या गुन्ह्यातून जामीनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा पिडीतेच्या हालचालीवर नजर ठेवली. पिडीता मार्च 2024 मध्ये खरेदीच्या निमित्ताने सांगलीत आल्याचे समजताच संशयीत मोईन नदाफ याने तिला गाठले. तू माझ्यावर गुन्हा का दाखल केलास, असा जाब विचारून तो गुन्हा मागे घेऊन तुला माझ्याबरोबर बोलावेच लागेल, असे धमकावले. तू तसे केले नाहीस तर हे बघ म्हणून आपल्या मोबाईलमधील तिच्याशी संबंधित अश्लिल फोटो आणि व्हिडीओ दाखवून हे व्हायरल करीन अशी धमकी दिली. त्या आक्षेपार्ह फोटोची भिती घालून संशयिताने तिला नदीकाठी, आमराईत आपल्याबरोबर येण्यास भाग पाडून तिच्याशी अश्लिल चाळे केले.
त्यानंतर कोल्हापूर रोडवरील एका लॉजवर येण्यास तिला भाग पाडून दि. 19 जुलै 2024 रोजी तिच्यावर बलात्कार केला. पुन्हा तिला बजावलेकी, तू कोणाशीच लग्न करायचे नाही. तू लग्न केलेतर तुझ्या होणाऱ्या पतीला हे फोटो आा†ण व्हिडीओ दाखवणार आहे. मी तुझ्याशी लग्न करतो, असे त्याने बजावले. त्यावेळी पिडीतेने मी तुझ्याशी लग्न करणार नाही, असे म्हणून त्याच्यापासून निघून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संशयीत मोईन नदाफने तिचा पाठलाग करून शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी दिली आहे. अशी आपली संपूर्ण कैफीयत पिडीतेने शहर पोलिसांत सांगून बुधवारी आपली फिर्याद दिली आहे.