Sangli Crime News: मित्रानेच केला घात, जुन्या वादाचं कारण अन् कोयत्याने सपासप वार
संशयित आरोपी अभिषेक मस्केला पोलिसांनी अटक केली आहे.
यड्राव : दोन वर्षांपूर्वी झालेल्या जुन्या वादाच्या कारणातून मित्रानेच मित्राचा डोक्यात, तोंडावर, मानेवर कोयत्याने वार करून खून केला. गणेश रमेश पाटील (वय 21, रा. आगर, ता. शिरोळ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शहापूर येथे शुक्रवारी रात्री घडली.
याप्रकरणी अभिषेक सुकुमार मस्के (वय 19, रा. आगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला शहापूर पोलिसांनी रात्री अटक केली. नामदेव गणपती चव्हाण (रा. आगर) यांनी याबाबतची फिर्याद दिली. याबाबत अधिक माहिती अशी, गणेश व अभिषेक हे दोघे मित्र असून मौजे आगर येथे एकाच परिसरात राहतात. या
यातून अभिषेक याने सोबत आणलेल्या कोयत्याने गणेश याच्या डोक्यावर, मानेवर व तोंडावर बार केले. गणेश रक्ताच्या थारोळ्यात पडला. हे पाहून अभिषेक तिथून पळून गेला. मार्गावरून येणाऱ्या नागरिकांनी याची माहिती शहापूर पोलिसांना कळवली.
शहापूर पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन गणेशला इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला सांगली सिव्हिल रुग्णालयात पाठविण्यात आले.
घटनास्थळी व इंदिरा गांधी रुग्णालयात पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी भेट देऊन माहिती घेतली व तपासाबाबत सूचना दिल्या. दरम्यान, काही तासातच गंभीर जखमी गणेश याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संशयित आरोपी अभिषेक मस्केला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे शहापूर परिसरात खळबळ उडाली आहे.