For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Breaking : भर चौकात तलवारीने हल्ला करून तरुणाचा खून; कौटुंबिक वादातून खूनामुळे जत शहर हादरले

08:17 PM Mar 06, 2024 IST | Abhijeet Khandekar
sangli breaking   भर चौकात तलवारीने हल्ला करून तरुणाचा खून  कौटुंबिक वादातून खूनामुळे जत शहर हादरले
Advertisement

जत, प्रतिनिधी

Advertisement

जत शहरातील विजयपूर गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील सोलनकर चौकात भर दिवसा तलवारीने हल्ला करून एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली अविनाश बाळू कांबळे ( वय 32 ) असे मयताचे नाव आहे. या खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसेल तरी कौटुंबिक वादातून झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून दोघा संशयिताना ताब्यात घेण्यात आले आहे. गजबजलेल्या व गर्दीच्या चौकात भर दिवसा तलवार हल्ला झाल्याने शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबतची घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळाळलेली माहिती अशी, खून झालेल्या अविनाश याच्या भावाचे संशयितांच्या बहिणीशी लग्न झाले होते. काही वर्षानंतर त्याच्या भावाचे निधन झाले. निधनानंतर काही दिवसांनी मयताची वहिनी शहरातील सोलनकर चौकात असलेल्या माहेरी रहाण्यास गेली. वहिनी माहेरहून परत येत नसल्याने मयत अविनाश हा त्यांच्या घरी जाऊन वारंवार वाद घालत होता. प्रसंगी हमरीतुमरी व्हायची. वारंवार त्रास देत असल्याने जत पोलीस ठाण्यात मयत अविनाश विरोधात तक्रारही दिली गेली होती.

Advertisement

तरीही वहिनीला सासरी पाठवा म्हणून अविनाश सारखा तगादा लावत असल्याने व वारंवार खटके उडत असल्याने संशयित वैतागला होता. बुधवारी सकाळी याच कारणावरून सकाळी येथील सोलनकर चौकात वाद निर्माण झाला. सुमारे दोन तास हा वाद सुरू होता. काहीजणांनी समजूत काढून दोघांनाही पाठवून दिले होते.

दरम्यान, दुपारी एकच्या सुमारास पुन्हा वहिनाचा भाऊ व अन्य एकजण मोटारसायकलवर सोलनकर चौकात आले. अविनाशही तिथेच होता. पुन्हा त्यांच्यात वाद उफाळून आला. वादाचे पर्यावसान मारामारीत झाले. यावेळी संशयितांनी अचानक तलवार घेऊन अविनाशवर हल्ला केला. त्याच्यावर मानेवर, डोक्यात व पाठीत वर्मी घाव घातल्याने तो जागीच कोसळला. प्रचंड रक्तस्राव झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे, पोलीस निरीक्षक सूरज बिजली घटनास्थळी तातडीने पोलीस फौजफाटा दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. सायंकाळी या प्रकरणी दोघा संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली, मात्र त्यांची नावे सांगण्यास नकार दिला. तलवारीने हल्ला झाल्याची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली. त्यामुळे घटनास्थळी बघ्याची गर्दी उसळली होती.

गेल्या दोन वर्षांपासून मार्च महिना म्हटला की माणसाचा दी एन्ड म्हणावा काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या १७ मार्चला नगरसेवक विजय ताड यांचा दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेला वर्ष पूर्ण होण्याआधीच बुधवारी भर दिवसा तलवारीने हल्ला करून तरुणाचा खून करण्यात आला. त्यामुळे मार्च एन्ड की दी एन्ड असा समज व्हावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

मयत अविनाश याच्या भावाचा मृत्यू झाल्यानंतर असलेल्या प्रॉपर्टीला विहिनीचे नाव लावावे यासाठी वहिनीचे नातेवाईक प्रयन्त करीत होते. मात्र याला अविनाशचा विरोध असल्याची चर्चा घटनास्थळी होती. या कारणामुळे खून करण्यात आला की अन्य कोणत्या कारणामुळे याचा तपास जत पोलीस करीत आहेत.

Advertisement
Tags :

.