For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli : गोकुळनगरात युवकाचा खून; विश्रामबाग हद्दीत आठ दिवसात दुसरा खून

12:41 PM Nov 09, 2023 IST | Abhijeet Khandekar
sangli   गोकुळनगरात युवकाचा खून  विश्रामबाग हद्दीत आठ दिवसात दुसरा खून
Sangli Crime
Advertisement

एक जखमी : इसरर्डे टोळीतील सहाजणांवर गुन्हा

सांगली प्रतिनिधी

विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोकुळनगर येथील पहिल्या गल्लीत ठेवलेल्या बायकोबरोबर एकजण बोलत असल्याच्या रागातून इसरडे टोळीकडून युवकाचा निर्घृण खून करण्यात आला. तर एक जखमी आहे. खून झालेल्या युवकाचे नाव विनोद किसन इंगळे वय 29 रा. संजयगांधी झोपडपट्टी गोकुळनगर असे आहे. तर जखमी युवकाचे नाव हनुमंत गोल्हार असे आहे. याप्रकरणी इसरडे टोळेतील सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना झाली. याबाबत विश्रामबाग पोलीसात अशोक किसन इंगळे रा. संजय गांधी झोपडपट्टी सांगली यांनी फिर्याद दिली आहे.

Advertisement

मंगळवारी रात्री गोकुळनगर येथील गल्ली नंबर एकमध्ये जखमी हनुमंत गोल्हार हा एका बाईशी बोलत उभा होता. ही बाई लखन इसरडेची ठेवलेली बायको आहे. त्यावेळी त्याचा मित्र विनोद इंगळे त्याच्यासोबत होता आणि तोही तिच्याशी बोलत असल्याची माहिती लखन इसरडे या गुंडाला समजली त्याने साथीदारासह येथे येवून हनुमंतला विचारणा करण्यास सुरूवात केली. वाद सुरू झाला. त्यातच विनोद मध्ये पडला त्यामुळे आलेल्या सहाजणांनी विनोद आणि हनुमंतवर कोयता आणि चाकूने हल्ला चढविला. विनोदच्या पाठीत आणि पोटात वार करण्यात आले.यामध्ये विनोद त्याचठिकाणी खाली कोसळला. तर हनुमंत जखमी होवून बाजूला पडला त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. या खुनाची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली. विनोदवर उपचार सुरू होण्यापुर्वीच तो मयत झाला होता. तर हनुमंत याच्यावर उपचार सुरू करण्यात आले.

इसरडे टोळीचे कारनामे काही वर्षापासून बंद होते. पण या खुनानंतर या टोळीचा कारनामा पुन्हा समोर आला आहे. इसरडे टोळीतील लखन इसरडे, मुदक्या उर्फ कृष्णा कांबळे, राकेश कांबळे, गजानन इसरडे, आकाश घागरे, विक्र्या उर्फ विक्रम माळगे या सहाजणांनी विनोद आणि हनुमंतवर हल्ला केला. या सहाजणांवर गुन्हा दाखल केला आहे. या सहाजणाकडून हनुमंतवर हल्ला कमी पण विनोदवर जोरदार हल्ले झाले. विनोदच्या पाठीवर आणि पोटात कोयत्याचे आणि चाकूचे वर्मी घाव लागल्यामुळे तो त्याचठिकाणी खाली पडला त्याच्याकडून प्रतिकार होत नाही हे पाहिल्यानंतरच हल्लेखोर पळून गेले.

Advertisement

विनोद याच्या नातेवाईक आणि मित्रांची वसंतदादा रूग्णालयात गर्दी
विनोदवर हल्ला झाला आहे हे समजताच त्याच्या नातेवाईकांनी आणि त्याच्या मित्रांनी वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात गर्दी केली होती. त्यामुळे पुन्हा काही उद्रेक होवू नये म्हणून पोलिसांनी गोकुळनगर व संजयगांधी झोपडपट्टी परिसरात बंदोबस्त वाढविला. दरम्यान या हल्लेखोरांचा शोध सुरू करण्यात आला.

खूनाच्या 24 तासानीही संशयित अटकेत नाहीत
विश्रामबाग पोलिसांनी या प्रकरणांचा तपास सुरू केला पण 24 तास झाले तरीसुध्दा या खुनाचे संशयित त्याच्या हातात आले नाहीत. इसरडे टोळीने पुन्हा डोके वर काढले आहे. काही वर्षापासून ही टोळी नेस्तानबूत करण्यात आली होती. पण आता खुनामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडूनही या संशयितांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

विश्रामबाग हद्दीत आठवड्यात दुसरा खून
विश्रामबाग हद्दीत वानलेसवाडी येथे पतीने चारित्र्याचा संशय घेवून पत्नीचा खून केला होता. त्याला आठवडा होत नाही तोपर्यंत गोकुळनगरमध्ये दुसरा खून झाला आहे. या सलगच्या खुनाच्या घटनामुळे सांगली हादरली आहे.

Advertisement
Tags :

.