मिरज तालुक्यातील एक गावात बालविवाह रोखला!
सांगली प्रतिनिधी
मिरज तालुक्यातील ए का अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात चाईल्ड लाईन टीम आणि पोलिसांना यश आले आहे. या अल्पवयीन मुलीचा कवठेमहांकाळ तालुक्यातील मुलासोबत विवाह होता. पथकाने रात्रीच मुलीच्या घरी जाऊन पालकांचे समुपदेशन करीत बालविवाह रोखला.
याबाबत माहिती अशी की, मिरज तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचा विवाह कवठेमंकाळ तालुक्यातील 23 वर्षीय तरूणाशी निश्चित झाला होता. ही माहिती चाईल्ड लाइन संस्थेला हेल्पलाईनद्वारे मिळाली. त्यांनी तातडीने बालकल्याण समितीला याची माहिती दिली. चाईल्ड लाईन टीम पोलिसांच्या मदतीने अल्पवयीन मुलीच्या गावी गेली. रात्री तिच्या पालकांचे समुपदेशन करण्यात आले. आधी पालकांनी आढेवेढे घेतले पण गावातील सरपंच, ग्रामसेवकांनी पालक व नातेवाईकांचे समजूत काढली. त्यानंतर पालकांनी अल्पवयीन मुलीला चाईल्ड लाईन टीमच्या स्वाधीन केले. पोलिस आणि चार लाईन टीमच्या सतर्कतेमुळे जिल्ह्यात आणखी एक बालविवाह रोखण्यात यश आले.