म्हैसाळमध्ये 17 लाखांचा गुटखा जप्त; मिरज ग्रामीण पोलीसांची कारवाई
म्हैसाळ वार्ताहर
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर म्हैसाळ ता. मिरज येथील चेकपोस्टवर तपासणी दरम्यान पिकअप टेंपोतून सुऊ असलेली गुटख्याची अवैध वाहतूक पकडण्यात तपासणी पथकाला यश आले. सुमारे 9 लाख ऊपये किंमतीचा गुटखा आणि गाडी, रोकड मोबाईल अशा साहित्यासह सुमारे 17 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक बी. ए. तारळेकर यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हैसाळ-कागवाड कर्नाटक सीमेवर चेकपोस्ट उभारले आहे. या ठिकाणी नियमितपणे अवैधरित्या दारू, गुटखा आदिसह अन्य बाबींची काटेकोरपणे तपासणी सुरू आहे. बुधवारी तपासणी दरम्यान कागवाडहून सांगलीकडे जाणारा पिकअप टेंपो (एमएच-10-सीआर-0641) हा पोलिसांची नजर चुकवून जाण्याच्या तयारीत होता. परंतु पोलीस कर्मचारी गणपती लोखंडे आणि अधिक शेजाळ यांनी शिताफीने वाहन कडेला घेऊन तपासणी केली असता, गाडीत सुमारे 9 लाखाचा गुटखा आढळून आला.
सदरचा गुटखा सांगली येथे घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले. यावेळी 9 लाख ऊपयांचा गुटखा, टेंपो, मोबाईल, रोकड यांचेसह 17 लाख ऊपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाहनचालक सोहेल शेख याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. एसएसटी पथक प्रमुख महेशकुमार लांडे, पोलिस उपनिरीक्षक पुनम लांडे, ग्रामसेवक सुनिल कोरे, गणपती लोखंडे, अधिक शेजाळ, प्रविण कांबळे या पथकाने ही कारवाई केली.