महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

म्हैसाळमध्ये पैशाच्या वादातून तरूणावर चाकू हल्ला

01:30 PM Sep 26, 2024 IST | Abhijeet Khandekar
crime knife attack
Advertisement

मिरज प्रतिनिधी

तालुक्यातील म्हैसाळ येथे पैशांच्या देवाण-घेवाणीच्या वादातून तरूणावर चाकू हल्ला करत जखमी करण्यात आले. याप्रकरणी कृष्णा विजय घाडगे (वय 30, रा. शांतीई गार्डन, दत्त पार्कजवळ, मिरज) यांनी मिरज ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार संशयीत कुमार भरत गोसावी, जलाल गणपत गोसावी, सुमनकुमार गोसावी आणि गोविंदकुमार गोसावी अशा चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement

कृष्णा घाडगे हे म्हैसाळ गावातील दत्त पार्कजवळ थांबले होते. यावेळी संशयीत चौघेजण अशोक लेलँड टेंपोतून आले. यावेळी कुमार गोसावी याने कृष्णा घाडगे यांना तू माझ्याकडे चार चौघात पैसे का मागतोस, तुझे 46 हजार ऊपये तुला देत नाही, असे म्हणून पाठीवर चाकूने वार केला. तर अन्य संशयीतांनी शिवीगाळ दमदाटी केली. चाकू हल्ल्यात कृष्णा घाडगे हे जखमी झाले आहेत. याबाबत ग्रामीण पोलिसात नोंद आहे.

Advertisement

 

Advertisement
Tags :
money dispute in MaisalSangli crime
Next Article