दारू पित असताना एकमेकांकडे रागाने बघितल्याने युवकाच्या डोक्यात कोयता घातला
हॉटेल प्रशांत येथील घटना: संजयनगर पोलीसांच्याकडून तात्काळ हल्लेखोर ताब्यात
सांगली प्रतिनिधी
हॉटेलमध्ये बसल्यानंतर दारू पित असताना एकमेकांकडे रागाने बघत असल्याचा संशय घेवून बुधगाव येथील युवकावर तिघांनी कोयत्याने हल्ला केला आहे. या हल्यात पवन बाबूराव सावंत वय 25 रा. बुधगाव, ता. मिरज हा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात उपचार सुरू आहेत. संजयनगर पोलीसांनी हल्लेखोरांना तात्काळ ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हॉटेल प्रशांत येथे बुधगाव येथील पवन सावंत हा दारू पित बसला होता. त्याचवेळी अन्य तिघेजण दुसऱ्या टेबलवर दारू पित होते. एकमेकांकडे बघत असताना या तिघांना पवन सावंत हा आपल्याकडे रागाने बघत असल्याचा संशय आला त्यातून त्यांनी पवन याला त्याचा जाब विचारला त्यावेळी पवन यानेही उलट विचारणा केली त्यामुळे या तिघांनी रागाने त्याच्या डोक्यात कोयता घातला. या हल्ल्यात पवन गंभीर जखमी झाला त्याला तात्काळ वसंतदादा सर्वोपचार रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. या घटनेची माहिती समजताच संजयनगर पोलीस ठाण्याकडील निरिक्षक बयाजी कुरळे आणि त्याचे पथक घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी तात्काळ या संशयितांना अटक करण्याची सूचना दिली त्यानंतर सांयकाळी यातील तिघे संशयित संजयनगर पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत.
पोलीसांच्याकडून पवनच्या वडिलांकडून फिर्याद घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान हा हल्ला दारू पिताना एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून झाला की अन्य कारणावरून झाला याचा शोध पोलीस घेत आहेत.