मुलीस पळविल्याचा आरोप करत सहा जणांकडून मारहाण! घरदार पेटवून देण्याची दिली धमकी
: सांगली ग्रामीण पोलीसात सहा जणाविरूध्द गुन्हा दाखल
सांगली प्रतिनिधी
मुलीस पळा†वल्याचा आरोप करीत सहाजणांनी पहाटेच्या सुमारास एका घरात घुसून सदस्यांना मारहाण करीत घरदार पेटवून देण्याची धमकी ा†दल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. ही मारामारी मंगळवारी 24 सप्टेंबर रोजी पहाटे पाचच्या सुमारास घडली.
याप्रकरणी जखमी झालेल्या विजय भीमराव मोरे (वय 46, रा. हा†रपूर, ता. मिरज) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पा†लसांनी संशा†यत सां†दप बाबुराव केंचे, निखील केंचे, अजिंक्य केंचे, सुनील तांदळे, सागर तांदळे, मल्हारी बापू तांदळे (सर्व रा. हा†रपूर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
घटनेची माहिती अशी, फिर्यादी विजय मोरे हे आपल्या कुटुबियासमवेत घरी झोपले असताना पहाटे पाचच्या सुमारास संशयित सहा जणांनी घराचा दरवाजा वाजवला. विजय मोरे यांनी दरवाजा उघडल्यावर घरात अनधिकृतपणे प्रवेश करून विजय यांचा मुलगा प्रज्वलने आमची मुलगी कोठे लपवून ठेवली आहे? असा जाब विचारला आणि फिर्यादी विजय यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास प्रारंभ केला.
यामध्ये विजय मोरे यांचा ओठ फाटला. भांडण सोडा†वण्यास मध्ये पडलेल्या प्रज्वल आणि आई मंगल यांना देखील मारहाण करण्यात आली. त्यानंतर जखमी मोरे यांनी या सहा जणाविरूध्द सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सांगली ग्रामीण पोलीस करत आहेत.