For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गदेसह मशाल घेऊन चंद्रहारला दिल्लीला पाठवा' : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आवाहन :

08:42 PM Mar 11, 2024 IST | Abhijeet Khandekar
गदेसह मशाल घेऊन चंद्रहारला दिल्लीला पाठवा    पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आवाहन
Advertisement

डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांचा शिवसेना प्रवेश : सांगली जिल्हा लोकसभा संघटकपदी नियुक्ती

Advertisement

सचिन भादुले विटा

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करीत उद्धव ठाकरें शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुंबईतील मातोश्रीवर झालेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते त्यांनी शिवबंधन बांधले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांनी चांदीची गदा भेट दिली. गदेबरोबर मशाल घेऊन पै. चंद्रहारला दिल्लीला पाठवा असे आवाहन करीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यासह सांगली जिल्हयातील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

पहा VIDEO >>> ५०० गाड्यांचा ताफा घेऊन मातोश्रीकडे रवाना

गेल्या काही दिवसांपासून हबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या पै. चंद्रहार पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी आग्रही होते. त्यासाठी त्यांनी गेल्या वर्ष दिड वर्षापासून तयारी सुरू केली आहे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या माध्यमातून त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेना प्रवेशाबाबत चर्चा केली होती. अखेरीस सोमवारी मोठे शक्तीप्रदर्शन करीत त्यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याहस्ते शिवबंधन बांधले. यावेळी जोरदार घोषणाबाजी आणि जल्लोषी वातावरण पहायला मिळाले.

खासदार संजय राऊत यांनीही 'अब की बार चंद्रहार, असा नारा देत पै चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीचे संकेत दिले. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही गदेबरोबर मशाल घेऊन पै. चंद्रहार पाटील यांना दिल्लीत पाठवा, असे आवाहन करीत पै. चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीचे संकेत दिले. पै. चंद्रहार पाटील यांनीही आपण कुस्तीगीर आहोत आपल्याला बोलायला जमत नाही, तर आपण मैदानात करून दाखवणारे मल्ल आहोत, असे सांगत शिवसेनेने शेतकऱ्यांच्या मुलाचा सन्मान केल्याचे बोलून दाखवले

सोमवारी सकाळीच गाड्यांचा मोठा ताफा घेऊन पै चंद्रहार पाटील सांगली जिल्ठ्यातील ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांसठ मुंबईकडे खाना झाले. त्यांच्या समवेत शिवसेना उपनेते नितीन बानुगडे पाटील, साजन पाचपुते, जिल्हाप्रमुख संजय विभूते, बजरंग पाटील, शंभूराज काटकर, सिद्धार्थ जाधव यांच्यासह पदाधिकारी त्यांच्यासमवेत होते.

मातोश्रीवर झालेल्या कार्यक्रमात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील म्हणजे कुस्ती क्षेत्रातील सचिन तेंडुलकर असल्याचे सांगितले. आत्तापर्यंत अनेक पक्षप्रवेश झाले. मोठ्या नेत्यांचे आणि अभिनेत्यांचे झाले. मात्र देशाच्या कुस्तीतील महाराष्ट्राचे वैभव चंद्रहार पाटील शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. चंद्रहारची गदा शिवसेनेच्या मशालीबरोबर आपली ताकद दाखवेल, असे खासदार राऊत म्हणाले.

पै. चंद्रहार पाटील म्हणाले, एका शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही सांगली लोकसभेच्या दृष्टीने मान दिलात. तुम्ही राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या मुलांचा सन्मान केला आहे. मला बोलण्यापेक्षा करून दाखवण्याची सवय आहे. येणाऱ्या लोकसभेला महाराष्ट्रातील पहिला निकाल सांगलीचा असेल, असा विश्वास पै चंद्रहार यांनी व्यक्त केला.

यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, आज माझी छाती अभिमानाने फुलून आली आहे. छाती किती इंच झाली, हे सांगू शकत नाही. या मर्दाची छाती बघितल्यानंतर सांगलीत आता आपल्याशी लढण्याची कोणाची छाती होणार नाही, परंतु नुसत्या घोषणा देऊन चालणार नाही. पक्षातून पळपुटे पळून जाताहेत, पण मर्द शिवसेनेत येत आहेत. शिवसेना ही मर्दाची संघटना आहे. मी लहान असताना पै. मारुती माने मातोश्रीवर यायचे, बाळासाहेबांना भेटायचे, बोलायचे. आजही तिच परंपरा कायम आहे. अब की बार चंदहार अशा नुसत्या घोषणा देवून चालणार नाही. तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल. लोकांनी ठरवले आहे. जनतेने एकदा संकेत दिल्यानंतर त्या पलिकडे काय संकेत देणार?, असे सांगत गदा आणि मशाल दोन्ही मर्दाच्या हाती शोभतात. ही गदा आणि मशाल घेऊन आपल्याला सांगलीतील एक मर्द दिल्लीत पाठवायचा आहे. सांगलीत बरेच वर्ष झाले, मी आलेलो नाही, पण आता येणार. हुकूमशाही विरोधात लढताना तुमच्यासारखे तरणेबांड मर्द शिवसेनेत आलेले आहेत. भविष्य तुमच्या हातात आहे. जनता तुमच्याकडे अपेक्षेने बघते आहे. आजच्या पक्ष प्रवेशाने जनतेचा विश्वास दृ ढ झाला असेल. मी सांगलीला प्रचाराला येईनच, पण विजयाच्या सभेला मला बोलावणार काय? अशी विचारणा करीत शेतकऱ्यांच्या अपेक्षांचे ओझे आपल्याला पेलायचे आहे. शिवसेनेच्या सांगली जिल्हा लोकसभा संघटकपदी पै. चंद्रहार पाटील यांची नियुक्ती करीत असल्याची घोषणा ठाकरे यांनी केली.

Advertisement
Tags :

.