कृष्णा कॅनॉलचे आवर्तन लांबल्याने शेतकऱ्यांचे नुकसान; पाणी न सोडल्यास पाटबंधारे विभागाला ठाळे ठोकण्याचा इशारा
पलूस / प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील तारळी धरणातून कृष्णा कॅनॉलचे आवर्तन लांबल्याने पलूस व तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने आव क्रमक झालेल्या पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन उभारले. पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांनी बुधवारी विजापूर-गृहाघर राज्य महामार्ग रोखला. येत्या आठ दिवसात कृष्णा कॅनॉलला पाणी न सोडल्यास पाटबंधारे विभागाच्या कार्यालयास ठाळे ठोकणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. येधील गुंडादाजी चौक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प हार घालून आंदोलनास सुरूवात करण्यात आली. तेथून शेकडो शेतकऱ्यांनी एकत्रित येत राज्यमहामार्ग रोखला.
यावेळी मारूती चव्हाण म्हणाले, गेल्या दिड महिन्यापासून आनदार विश्वजीत कदम, आमदार अरूण लाड यांनी प्रयत्न केले परंतु प्रशासनाने कोणतीही दाद व प्रतिसाद दिलेला नाही. २.७० टीएम.सीपाणी आमच्या हक्काचे आहे. परंतु प्रशासन च शासनाची अधिकारी धरण त्यांची खाजगी मालमत्ता असल्यासारखे वागत आहेत. शेतकयांच पाण्याविना हाल करत आहेत. आज शेतकऱ्याचा संयम आहे पिके वाळली तर कायदा हातात घ्यावा लागेल. पाणी असून तुम्ही देत नाही. ज्यावेळी शेतकरी पटेल त्यावेळी तो कुणाच ऐकणार नाही शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फोडू नका असा इशारा त्यांनी यावेळी दिला. गेल्या पंधरा दिवसापासून पाणी आम्हाला दया अशी मागणी आम्ही करीत आहोत. द्राक्ष पिक आठ ते दहा हजार क्षेत्रातील बागा संकटात सापडल्या आहेत. आणखी पंधरा दिवस पाणी न आल्यास बांगाना पिके चांगली येणार नाहीत. ऊस सुरळीपर्यत वाळत आलेला आहे. तरीसुध्दा यांच लक्ष नाही. तारळी धरणात पाण्याचा साठा पुरेसा आहे. परंतु हेकेखोरपणामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहे. २.७० टीएमसी हे पाणी हक्काचे आहे. सोडण्यात चेणाऱ्या पाण्याची तारळी धरणाजवळ मेजरमेट लावायची नाही ती खोडशी धरणाजवळ लावावी. खोडसी पासून ते वसगडेपर्यत लोखंडी पाईप लाईन करावी. सातारा आणि सांगली जिल्हयातील अंभियत्यांना पाणी सोडण्याचे अधिकार दयावेत. पाणी सोडण्यासाठी राजकीय हस्तक्षेप थांबवावा. कॅनॉलची स्वच्छता करून वाढलेली झाडे तोडून घ्यावीत. अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली.
यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी अमोल पाटील यांना मागणीचे निवेदन दिले. यावेळी पलूसचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण साळुंखे, नगरपरिषदेचे गटनेते सुहास पुदाले, पोपट मोरे, गणपतराव सावत, संदीप सिसाळ, विनायक गोंदील, डॉ. अमोल पार, पांडूरंग इनामदार, रोहीत दळवी, अजित पुदाले, पोपट माळी, जंबा मोरे, सुरेश पुदाले, सुधीर जाधव, यांच्यासह पलूस, बोरजाईनगर, वेळावी, बसडगे परिसरातील शेतकरी उपस्थित होते.