Sangli Breaking : संख येथे कापड दुकानास आग; एक कोटींचे नुकसान
संख, वार्ताहरज
जत तालुक्यातील संख येथील गडदे वस्त्र निकेतन कपड्याच्या दुकानाला आग लागून एक कोटी रुपयाची नुकसान झाले आहे. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचे सांगण्यात येत आहे.
येथील गडदे वस्त्र निकेतन कपड्याच्या दुकानाला सकाळी साडेसात वाजता शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. यात अंदाजे एक कोटी रुपयाचा नुकसान झाल आहे. संख येथे गडदे वस्त्र निकेतन नावाचे कपड्याचे भव्य दिव्य दुकान आहे. दीपावलीला येथे अनेक व्हरायटी कपडे आणले होते.सदर दुकानात कपडे खरेदी करण्यासाठी संख व परिसरातील लोक येत असत .
गडदे यांनी तीन मजली कपडे माल भरला होता. तसेच दीपावली निमित्त बाहेरही पत्रा शेड मारून कपडे भरले होते. अनेक निरनिराळ्या व्हरायटी कपडे आणले होते.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी शॉर्टसर्किट होऊन आग लागली. या आगीची झळ इमारतीलाही बसली. गुरुवारी दुकानाचे मालक संध्याकाळी दुकान बंद करून घरी गेले होते. सकाळी साडेसात वाजता इमारतीच्या उत्तर साईडला शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. आगीत अंदाजे एक कोटीचा नुकसान झाला आहे. आग विझवण्यासाठी जत होऊन अग्निशमन गाडी बोलवण्यात आली होती. गावातील नागरिक आग विझवण्यासाठी मदत करीत होते .पाण्याची दोन टँकर आणून आग विझवण्यात आली. गाव कामगार तलाठी शंकर बागेळी व कोतवाल कामराज कोळी यांनी पंचनामा करून अहवाल सादर केले आहे.तसेच या घटनेची नोंद उमदी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.