Sangli : ग्रामपंचायतीत जिह्यामध्ये भाजपा- राष्ट्रवादीत टक्कर !
सांगली प्रतिनिधी
ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपाचे कमळ चांगलेच फुलले असून 84 पैकी भाजपने सर्वाधिक 31 ग्रामपंचायती जिंकून पहिला क्रमांक पटकावला आहे. तर शिराळा आणि कवठेमहांकाळ तालुक्यात ग्रामपंचायती सर्वाधिक जागा जिंकून राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर राहिली असून पक्षाला 27 ठिकाणी सत्ता मिळाली. काँग्रेस आणि माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाने प्रत्येकी सात तर शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्या गटाने सहा ग्रामपंचायतीत सत्ता मिळवली. सोळा ठिकाणी स्थानिक आघाड्यांनी ग्रामपंचायतीवर झेंडा फडकाविला. काही ठिकाणी सत्तांतर झाल्याने दिग्गजांना धक्का बसला तर अनेक ग्रामपंचायतींवर सत्ता राखण्यात नेत्यांना यश आले. निकाल हाती येताच कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत आणि आतषबाजी करीत जलोष केला.
जिह्यातील दहा तालुक्याच्या तहसीलदार कार्यालय परिसरामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी दहा वाजता सुऊवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार, उमेदवार आणि उमेदवार प्रतिनिधी उपस्थित होते. जिह्यातील 94 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक लागली होती. त्यापैकी 11 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. रविवारी 84 ग्रामपंचायतींसाठी चुरशीने मतदान झाले होते. ग्रामपंचायतीची निवडणूक राजकीय चिन्हावर लढविता येत नसली तरी महाविकास आघाडी विरूद्ध भाजप अशी रंगल्याने निकालाबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. ग्रामपंचायतीचा निकाल साडेदहा वाजल्यापासून हाती यायला सुऊवात झाली. दुपारपर्यंत सर्व ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर करण्यात आले.
एकूण 84 पैकी भाजपने निकालामध्ये सर्वाधिक 31 ग्रामपंचायतींवर झेंडा फडकविला. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाने 27 ग्रामपंचायती जिंकून दुसरे स्थान मिळवले. काँग्रेस सात, घोरपडे गट सात, शिंदे गट सहा तर इतर स्थानिक आघाड्यांनी 16 ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळाली. राष्ट्रवादीने शिराळा तालुक्यातील 29 पैकी सर्वाधिक 15 ग्रामपंचायतींवर वर्चस्व ठेवून आमदार मानसिंगराव नाईक, माजीमंत्री शिवाजीराव नाईक आघाडी ग्रामीण मतदाराने स्वीकारल्याचा निकालातून स्पष्ट झाले. वाळवा तालुक्यातील चारपैकी तीन ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यशस्वी ठरले. पण, कारंदवाडी या राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात मित्र पक्षांचे सहकार्य घेऊन भाजपने शिरकाव केला आहे. येथे राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेतील माजी सदस्य संभाजी कचरे यांचा सरपंचपदाच्या निवडणुकीत पराभव झाला.
कवठेमहांकाळ तालुक्यातील 20 पैकी आठ ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे ठेवण्यात आमदार सुमनताई पाटील यांना यश आले आहे. तसेच सात ग्रामपंचायती खेचून आणण्यात माजी मंत्री अजितराव घोरपडे यशस्वी झाले आहेत. आटपाडी तालुक्यातील 17 ग्रामपंचायतांपैकी नऊ ग्रामपंचायती आमदार गोपिचंद पडळकर, माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख गटाने ताब्यात घेतल्या आहेत. शिवसेना चार आणि स्थनिक आघाड्यांनी चार ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले. येथे काँग्रेस, राष्ट्रवादीला खातेही उघडता आले नाही. जत तालुक्यात पाचपैकी सर्व ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यात भाजपचे माजी आ. विलासराव जगताप यशस्वी ठरले आहेत.
खानापूर तालुक्यातील चार ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायती शिवसेनेचे आ. अनिल बाबर गटाकडे तर दोन ग्रामपंचायती भाजप- राष्ट्रवादी आघाडीला मिळाल्या आहेत. कडेगाव तालुक्यातील तीन पैकी दोन ग्रामपंचायती काँग्रेसकडे ठेवण्यात माजीमंत्री विश्वजित कदम यांना यश आले आहे. एका ग्रामपंचायतीवर भाजपला समाधान मानावे लागले. पलूस तालुक्यातील चारपैकी काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन ग्रामपंचायती मिळाल्या आहेत. तासगावमध्ये दोन्ही ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व राखण्यात खा. संजय पाटील यशस्वी झाले.
कारंदवाडीत राष्ट्रवादीला धक्का
वाळवा तालुक्यातील कारंदवाडी येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सरपंचपदाचे उमेदवार जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संभाजी कचरे यांना पराभवाचा धक्का बसला. दुसरीकडे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांनी तांबवे येथे सत्ता मिळवून गट कायम ठेवण्याचा प्रयत्न केला.
सत्ता मिळालेल्या पक्षा†नहाय ग्रामपंचायती
भाजप -31
राष्ट्रवादीने -27
काँग्रेस -07
अजिततराव घोरपडे गट- 07
अनिल बाबर गट -06
स्थानिक आघाड्या -16