कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Sangli News : वंचित बहुजनच्या कार्यकर्त्यांकडून सांगलीतील अदित्य हॉस्पिटलची तोडफोड

11:47 AM Jun 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वंचित बहुजन आघाडीच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांनी हा धिंगाणा घातला

Advertisement

सांगली : कामगार विमा योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णाकडून पैसे घेतले जात असल्याचा आरोप करत शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या अदित्य हॉस्पिटल या खासगी रुग्णालयाची प्रचंड तोडफोड करण्यात आली. हा प्रकार मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास घडला. वंचित बहुजन आघाडीच्या 25 ते 30 कार्यकर्त्यांनी हा धिंगाणा घातला. याप्रकरणी हॉस्पिटलच्यावतीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात या कार्यकर्त्यांच्याविरूध्द फिर्याद देण्यात आली आहे.

Advertisement

याप्रकरणी विश्रामबाग पालिसांनी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शंकर माने यांच्यासह 17 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मंगळवारी दुपारी रुग्णालयाचे दैनांदिन कामकाज सुरु असताना हे कार्यकर्ते हातात निळे झेंडे घेऊन रुग्णालयात घुसले. कोणाला काही कळण्याच्या आधीच त्यांनी स्वागतकक्षापासून तोडफोड सुरु केली.

हातात हॉकी स्टीक घेतलेले कार्यकर्ते दिसेल त्या साहित्याची तोडफोड करत होते. काही कर्मचाऱ्यांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला, मात्र कार्यकर्ते आक्रमक होते. त्यांनी स्वागतकक्ष फोडला. सोनोग्राफी कक्षात तोडफोड केली. तीन ते चार संगणकांची नासधूस केली. तळमजल्यावर धिंगाणा घातल्यानंतर त्यांनी पाहिल्या मजल्यावर चाल केली तेथेही नासधूस केली. त्यामुळे सर्वत्र काचांचा सडा पडला होता.

त्यानंतर कार्यकर्ते दुसऱ्या मजल्याकडे धावले. तेथे आंतररुग्ण विभागात अनेक रुग्ण उपचार घेत होते. कार्यकर्त्यांचा पावित्रा लक्षात घेऊन रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब दाराला कुलूप लावून घेतले. त्यामुळे कार्यकर्ते खाली उतरले निघून गेले. दरम्यान तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आरोप केला की, कामगार विमा योजनेतून रुग्णालयात विनाशुल्क उपचार करणे आवश्यक आहे, पण या ठिकाणी रुग्णांकडून पैसे घेण्यात येतात.

गोरगरीब रुग्णांकडून अशाप्रकारे पैसे उकळण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही. दरम्यान, विश्रामबाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुधीर भालेराव पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. कायदा हाती घेण्याचा प्रकार सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला.

रुग्णालयाच्या कामकाजाविषयी आक्षेप असतील, तर कायदेशीर मार्गाने जावे, तोडफोड केल्यास कडक कारवाई करु असा इशारा दिला. दरम्यान, धरपकड केलेल्या कार्यकर्त्यांना विश्रामबाग पालिस ठाण्यात बसवून ठेवले होते. त्यांच्याविरोधात ऊग्णालय प्रशासनाकडून तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया सायंकाळपर्यंत सुरु होती.

इंडियन मेडिकल असोसिएशनकडून निषेध

दरम्यान अदित्य हॉस्पिटल येथे धिंगाणा घालणाऱ्या कार्यकर्त्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि डॉक्टरांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. या घटनेचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

Advertisement
Tags :
#Police action#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia#Vanchit Bahujan Aaghadiemployee insuranceSangli crimesangli news
Next Article