Sangali News:बोलरोच्या धडकेत एक वर्षाची चिमकुली ठार
सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंदविली फिर्याद
सांगली: चारचाकीने शेताच्या कडेला झाडाखाली खेळत असणाऱ्या एक वर्षीय चिमुकलीस जोरदार धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. दीदी अनिल पवार (वय १, मूळ गाव चाँदतारा गल्ली, साखरी, जि. धुळे. सध्या रा. मौजे डिग्रज, ता. मिरज) असे चिमुकल्या मुलीचे नाव आहे.
हा अपघात गुरुवारी सांयकाळी पाचच्या सुमारास पद्माळे येथे झाला. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात अनिल प्रवीण पवार (रा. मौजे डिग्रज) यांनी फिर्याद नोंदविली आहे.
पद्माळेच्या हद्दीत असणाऱ्या आकाश तानाजी जाधव यांचे गट क्र. ४७ शेतात फिर्यादी अनिल पवार यांच्यासह त्यांची पत्नी योगिता या ऊसतोडीकरिता गेल्या होत्या. त्यावेळी त्यांची तीन मुलांसह अन्य ऊसतोड करणाऱ्या कामगारांची मुले
शेताच्या कडेला नारळाच्या झाडाखाली खेळत होती.
दुपारच्या सुमारास संशयित कैलास प्रकाश रोकडे (वय ३५,रा. बहे, ता. वाळवा) याने चारचाकी (क्र. एमएच १३ एएक्स ७६६६) भरधाव वेगाने तेथून घेवून जात होता. त्यावेळी चारचाकीची दिदी पवार हिला धडक बसली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलिसांनी चालक कैलास रोकडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.