राजस्थान रॉयल्सच्या प्रमुख प्रशिक्षकपदी संगकारा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
2026 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी लंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराची राजस्थान रॉयल्स संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा या संघाच्या फ्रांचायझीनी सोमवारी केली.
राजस्थान रॉयल्सच्या प्रमुख प्रशिक्षकपदाची जबाबदारी यापूर्वी राहुल द्रवीडकडे सोपविण्यात आली होती. दरम्यान गेल्या ऑगस्टमध्ये राहुल द्रवीडने राजस्थान रॉयल्स संघ सोडण्याचा निर्णय घेतला. 2021 पासून कुमार संगकारा हे क्रिकेट संचालक म्हणून कार्यरत होते. 2021 ते 2024 या कालावधीत संगकारा प्रमुख प्रशिक्षकपद भूषवित होते. आता कुमार संगकाराकडे 2026 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी प्रमुख प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
2025 च्या आयपीएल क्रिकेट हंगामात भारताचा माजी कर्णधार राहुल द्रवीड राजस्थान रॉयल्सचा प्रमुख प्रशिक्षक म्हणून कार्यरत होता. दरम्यान राजस्थान रॉयल्सची गेल्या वर्षीच्या आयपीएल स्पर्धेची कामगिरी निराशजनक झाल्याने द्रवीण खूपच नाराज झाला आणि त्याने आपले हे प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या वर्षीच्या आयपीएल हंगामात राजस्थान रॉयल्स संघाला शेवटून दुसऱ्या स्थानावर म्हणजेच नवव्या समाधान मानावे लागले होते. राजस्थान रॉयल्सने 14 पैकी केवळ 4 सामने जिंकले होते.
राजस्थान रॉयल्स संघातील यष्टीरक्षक आणि फलंदाज संजीव सॅमसन आता चेन्नई सुपर किंग्जमध्ये दाखल होत आहे. तर त्याबद्दलत्या चेन्नई संघातील अनुभवी अष्टपैलु रविंद्र जडेजा आणि सॅम करण हे राजस्थान रॉयल्स संघात दाखल होत आहेत. राजस्थान रॉयल्स संघाने चालु वर्षीच्या आयपीएल हंगामासाठी तीन विदेशी क्रिकेटपटूंसह एकूण 7 क्रिकेटपटूंची मुक्तता केली आहे. 2026 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी क्रिकेटपटूंचा लिलाव कार्यक्रम अबुधाबीत 16 डिसेंबर रोजी आयोजित केला आहे.