For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News : साने गुरुजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचा तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत घवघवीत यश...

05:40 PM Oct 06, 2025 IST | NEETA POTDAR
solapur news   साने गुरुजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचा तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत घवघवीत यश
Advertisement

                               तालुक्यातील विविध शाळांमधील अनेक संघांनी घेतला सहभाग 

Advertisement

by समीर शेख 

सोलापूर : होटगी (ता. दक्षिण सोलापूर) येथे श्री. एस. व्ही. सी. एस. प्रशाला, होटगी यांच्या वतीने आयोजित पावसाळी तालुकास्तरीय १४ वर्षाखालील मुलींची खो-खो स्पर्धा दिनांक ३ ऑक्टोबर २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांमधील अनेक संघांनी सहभाग घेतला. स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली असून, प्रत्येक संघाने आपले सर्वोत्तम कौशल्य दाखवले.

Advertisement

या स्पर्धेतील अंतिम सामन्यात साने गुरुजी विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, अंत्रोळी या शाळेच्या मुलींनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. संघातील खेळाडूंनी दमदार बचाव आणि चपळ आक्रमण यांच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाला पराभूत केले. या विजयामुळे अंत्रोळी प्रशालेने संपूर्ण तालुक्यात आपला ठसा उमटवला असून, त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

संस्थेचे अध्यक्ष आनंदकुमार अंत्रोळीकर, सचिव भीमराव परीक्षाळे सर तसेच सर्व संचालक मंडळ यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन करत विद्यार्थिनींचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, “हा विजय शाळेच्या क्रीडाक्षेत्रातील सातत्यपूर्ण प्रयत्नांचा आणि विद्यार्थिनींच्या मेहनतीचा परिपाक आहे.” तसेच सर्व खेळाडूंना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

या विजयी संघाच्या यशात क्रीडा शिक्षक जी. आर. कोले सर आणि आदर्श खो-खो खेळाडू सोमनाथ साळुंखे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. दोन्ही शिक्षकांनी विद्यार्थिनींना नियमित सराव, शिस्त आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व पटवून दिले.

या खो-खो विजयी संघातील खेळाडू विद्यार्थिनीं निलोफर शब्बीर शेख, निकीता देवराया बेलदार, वैष्णवी नवनाथ थोरात, यशवंती अतूल थोरात, श्रद्धा ज्ञानेश्वर भोरकडे, मानवी केशव परिक्षाळे, देवयानी संजय कर्वे, प्राची संजय आठवले, लक्ष्मी नाथाजी केंगार, काजल राम कोळी, नम्रता महादेव करपे दर्शनी विकास भंडगे. या विद्यार्थिनींच्या यशात शाळेतील सर्व शिक्षकांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे.

मुख्याध्यापक नुरुद्दिन शेख सर, दिलशाद पठाण मॅडम, दत्तात्रय शिंदे सर, रविंद्र गावित सर, म्हाळप्पा वडरे सर, बसवराज चौगूले सर, गोपाळ पाटील सर, शर्मा सुतार आणि उमाकांत कांबळे यांनी विद्यार्थिनींना प्रोत्साहन देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवला.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. एस. व्ही. सी. एस. प्रशाला, होटगी तसेच सर्व शिक्षक व क्रीडा समिती सदस्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले.

अंत्रोळी गावासह परिसरातील नागरिकांनी या यशाचा आनंद व्यक्त केला असून, पुढील जिल्हास्तरीय फेरीतही अंत्रोळी प्रशालेच्या संघाकडून यशाची पुनरावृत्ती होईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.

Advertisement
Tags :

.