For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रॅक्टिकल मॅजिकच्या सीक्वेलमध्ये सँड्रा-निकोल

06:10 AM Jul 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रॅक्टिकल मॅजिकच्या सीक्वेलमध्ये सँड्रा निकोल
Advertisement

1998 मध्ये वॉर्नर ब्रदर्सकडून प्रदर्शित ‘प्रॅक्टिकल मॅजिक’ या चित्रपटाचा सीक्वेल येणार आहे. वॉर्नर ब्रदर्सने चित्रपटाच्या दुसऱ्या भागात सँड्रा बुलॉक आणि निकोल किडमन पुन्हा दिसून येणार असल्याची माहिती दिली आहे. या दोन्ही अभिनेत्रींशी सीक्वेलसंबंधी चर्चा सुरू आहे.

Advertisement

रॉबिन स्विकॉर्ड आणि एडम ब्रूक्ससोबत मूळ चित्रपटाची कहाणी लिहिणारे अकीवा गोल्ड्समॅन या चित्रपटाची कहाणी लिहिणार आहेत. सँड्रा आणि निकोल या चित्रपटाच्या निर्मितीत देखील योगदान देऊ शकतात.

प्रॅक्ट्रिकल मॅजिक हा चित्रपट 1995 मध्ये प्रकाशित आय. एलिस हॉफमॅन यांच्या कादंबरीवर बेतलेला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन ग्रिफिन डन यांनी केले होते. या चित्रपटाची कहाणी दोन बहिणी सैली (सँड्रा बुलॉक) आणि गिलियन ओवेन्स (निकोल किडमन) यांच्या अवतीभवती घुटमळणारी होती.

Advertisement

निकोल किडमन अलिकडेच एक्सपॅट्स या सीरिजमध्ये दिसून आली आहे. तर ए फॅमिली अफेयर या सीरिजमध्ये तिने जॅक एफ्रॉन आणि जॉय किंग यांच्यासोबत काम केले आहे. याचबरोबर निकोल ही मर्डर मिस्ट्री ऑफ द परफेक्ट कपल हा चित्रपट, अमेझॉन प्राइम व्हिडिओची सीरिज स्कारपेटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर सँड्रा बुलॉकने बुलेट ट्रेन आणि द लॉस्ट सिटीसोबत बर्ड बॉक्स तसेच द अनफॉरगिवेबल या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Advertisement
Tags :

.