कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

संदीप वझरकरची 232 कोटींची मालमत्ता जप्त

12:56 PM Jul 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

यापूर्वी जप्त केलीय 319 कोटींची मालमत्ता : जमीन हडप प्रकरणी ईडीची धडक कारवाई

Advertisement

पणजी : बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हडपप्रकरणी अंमलबजावणी  संचालनालयाने (ईडी) काल शुक्रवारी सकाळी 6 वाजता सुकुरचे माजी सरपंच संदीप वझरकर याच्या पर्वरी येथील घरावर परत छापा मारला. या अगोदर मारलेल्या छाप्यात वझरकार याच्याकडून 3.19 कोटी ऊपयांची 7 हजार 975 चौरस मीटर जमिनीची कागदपत्रे जप्त केली होती. काल शुक्रवारी दुसऱ्या एका प्रकरणात तब्बल 232 कोटी ऊपयांहून अधिक किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. बार्देश तालुक्यातील आसगांव, हणजूण, कळंगूट, नेऊल आणि पर्रा भागातील तब्बल 24 मालमत्ता तात्पुरत्या जप्त केल्या आहेत. या जमिनीची किमत सुमारे 193 कोटी 49 लाख ऊपये इतकी आहे. तसेच 15 एप्रिल 2024 रोजी 39.24 कोटींच्या 31 मालमत्ता कायमच्या जप्त केल्या आहेत. अशाच एका जमीन हडप प्रकरणात जप्त केलेल्या 11.82 कोटींच्या मालमत्तेचीही त्यात नोंद आहे.

Advertisement

तिघांच्या विरोधात आरोपपत्र 

मोहम्मद सुहेल उर्फ मायकल, विक्रांत शेट्टी, राजकुमार मैथी यांच्या विरोधातही गंभीर आरोप आहेत. तसेच इतर 36 जाणांविरोधात म्हापसा येथील विशेष पीएमएलए न्यायालयात सुमारे 7 हजार 400 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात 36 साक्षीदारांची नोंद आहे. ईडीच्या तपासाप्रमाणे या सगळ्यांनी बनावट कागदपत्राद्वारे जमीन हडप केल्याचा संशय आहे. आर्थिक गुन्हा विभाग (ईओसी) आणि विशेष तपास पथकाने एसआयटी) 2022 पासून या प्रकरणात 51 तक्रारी दाखल करून तपास सुऊ केला आहे.

जमीन हडप प्रकरणाचा सखोल तपास 

एप्रिल महिन्यातील शेवटच्या आठवड्यात ईडीने व्यावसायिक रोहन हरमलकर याच्या गोव्यातील पिळर्ण, पर्वरी, दिवाडी आणि अन्य जागांवर छापे मारले तेव्हा  सुमारे 1600 कोटी ऊपयांची कागदपत्रे जप्त केली होती. त्यात 1 हजार कोटी ऊपयांच्या जमिनींची बनावट कागदपत्रे आहेत. शिवाय 600 कोटी ऊपयांच्या स्थिर मालमत्तांच्या अस्सल कागदपत्रांचा समावेश होता. ईडीच्या या कारवाईमुळे राज्यातील जमीन घोटाळा प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. तसेच दोशींवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article