महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सावंतवाडी तालुका विविध औद्योगिक सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी संदीप माळकर

05:26 PM Dec 20, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

व्हाईस चेअरमन पदी संजय गवस

Advertisement

सावंतवाडी | प्रतिनिधी

Advertisement

सावंतवाडी तालुका विविध औद्योगिक सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कारिवडे येथील संदीप माळकर तर व्हाईस चेअरमन पदी दोडामार्ग येथील संजय गवस यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री आरोंदेकर यांनी काम पाहिले. यावेळी चेअरमन पदी श्री माळकर यांची तर, व्हाईस चेअरमनपदी   श्री गवस यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन तालुकाप्रमुख रुपेश राऊळ व पॅनल प्रमुख गजानन सावंत ,चंद्रकांत कासार, माजी सभापती रमेश गावकर आदींनी केले. यावेळी संचालक संजय गावडे, नारायण सावंत ,मुकुंद मेस्त्री ,मोहिनी गवस ,सुप्रिया नाईक ,उज्वला जाधव, सदानंद चव्हाण, पुरुषोत्तम राऊळ,मायकल डिसोजा ,शब्बीर मणियार, पप्पू ठक्कर ,श्रुतिका दळवी, भारती कासार ,नम्रता झारापकर ,प्रशांत बुगडे ,श्री काजरेकर , आबा केरकर ,आबा सावंत ,राजू शेटकर, अशोक परब, रेमी आल्मेदा ,सुनील गावडे सरिता गावडे आदी उपस्थित होते . यावेळी श्री माळकर म्हणाले निश्चितपणे तालुक्यात औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून चांगले काम करण्याचा आपला प्रयत्न राहील. असे त्यांनी स्पष्ट केले . या सहकारी संस्थेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने आपले वर्चस्व कायम राखले आहे. सहकार क्षेत्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने आपली झलक दाखवून दिली आहे.

Advertisement
Tags :
# tarun bharat news # election # Industrial Co-operative Society# sawantwadi
Next Article