महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

संदीप घोष यांची पॉलिग्राफ चाचणी होणार

06:49 AM Aug 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सीलदाह न्यायालयाची अनुमती, अन्य पाच जणांचाही समावेश

Advertisement

वृत्तसंस्था / कोलकाता

Advertisement

कोलकाता येथील वैद्यकीय महाविद्यायात महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार आणि नंतर तिची हत्या, या प्रकरणात महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांची असत्य चाचणी घेण्यात याव  असा आदेश सीलदाह येथील न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार सीबीआय घोष आणि या प्रकरणाशी संबंधित असलेल्या अन्य चार डॉक्टर्स यांची पॉलिग्राफ चाचणी किंवा लायडिटेक्टर टेस्ट लवकरच घेणार आहे.

त्याचप्रमाणे, ज्या महाविद्यालयात ही भीषण घटना घडली, त्या महाविद्यालयाच्या आर्थिक गैरव्यवहारांचीही चौकशी सीबीआयने करावी, असा आदेश कोलकाता उच्च न्यायालयाने दिला आहे. या महाविद्यालयाच्या आर्थिक व्यवहारांवर बऱ्याच काळापासून विविध आरोप होत आहेत. पैशाच्या अपहारापासून मृतदेहांच्या अवैध व्यापारापर्यंत अनेक आरोप करण्यात आले आहेत. या सर्व गैरप्रकारांची चौकशी आता सीबीआयकडे दिली गेल्याने बरीच रहस्ये उघडकीस येणार आहेत.

संप सुरूच ठेवण्याचा निर्धार

जोपर्यंत या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची चौकशी निर्णायक स्थितीत येत नाही, तोपर्यंत संप सुरूच ठेवला जाईल, असा निर्धार पश्चिम बंगालच्या कनिष्ठ डॉक्टर संघटनांनी व्यक्त केला आहे. हे प्रकरण भयानक आहे. त्यामुळे त्याची चौकशी त्वरित झाली पाहिजे आणि सर्व दोषींना शिक्षा झाली पाहिजे. चौकशी आणि तपासात महत्त्वपूर्ण प्रगती झाल्यानंतरच संप मागे घेण्यात येईल, असे या संघटनेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी पत्रकारांसमोर स्पष्ट केले आहे.

आरोपी निर्ढावलेला आणि लिंगपिसाट

या प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी संजय रॉय हा लिंगपिसाट असून अत्यंत निर्ढावलेला आहे. एवढे भीषण कांड करूनही त्याने एका अक्षरानेही पश्चात्ताप व्यक्त केलेला नाही. ज्या रात्री त्याने हे क्रूरकर्म केले, तिच्या आदल्या दिवशी तो पिडितेकडे वासनांध दृष्टीने पहात असल्याचे आणि त्याने तिचा पाठलाग केल्याचेही सीसीटीव्हीत दिसून आले आहे. सध्यातरी हा एकच आरोपी असल्याचे दिसत असले तरी सीबीआय या प्रकरणाचा सर्व दिशांनी तपास करीत आहे.

सीबीआयकडून संशय व्यक्त

ज्या चर्चागृहात ही घटना घडली, तेथील पुरावे आधीच नष्ट करण्यात आले असावेत, असा संशय सीबीआयने पुन्हा व्यक्त केला आहे. सीबीआयने या चर्चागृहाशी संबंधित सीसीटीव्ही फूटेजची बारकाईने पाहणी केली. तसेच, चर्चागृहाची देखील नव्याने तपासणी केली. या गृहाचा दरवाजा काही दिवसांपासून मोडलेल्या स्थितीत असल्याचे दिसून आले आहे. पिडिता डॉक्टरने 9 ऑगस्टच्या मध्यरात्री 2 ते 3 वाजण्याच्या आसपास या चर्चागृहात प्रवेश केला होता. तिला या गृहात झोपलेल्या स्थितीत पाहिल्याचे तिच्या सहकाऱ्यांनी जबाबात स्पष्ट केले आहे.

घोष यांची चौकशी सुरूच

सीबीआयने शुक्रवारी सलग पाचव्या दिवशी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांची चौकशी केली. त्यांना महाविद्यालयाच्या आर्थिक व्यवहारांसंबंधी आणि 9 ऑगस्टच्या प्रकरणाविषयी अनेक प्रश्न विचारण्यात आले. प्रश्नांच्या प्रत्येक सत्रात ते वेगवेगळी आणि परस्परविरोधी उत्तरे देत आहेत, असे दिसून आल्याचे सीबीआय अधिकाऱ्यांनी उघड केले आहे. असत्य चाचणीनंतर त्यांना अटक होऊ शकते.

विदेशांमध्येही पडसाद

या बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद विदेशांमध्येही उमटत आहेत. ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी या घटनेविरोधात अनेक स्थानी आंदोलने आणि निदर्शनांचे आयोजन केले होते. तसेच त्यांनी एका पत्रकाद्वारे पीडितेला त्वरित न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी

ड महाविद्यालयाच्या आर्थिक गैरव्यवहारांच्याही सीबीआय चौकशीचा आदेश

ड माजी प्राचार्य संदीप घोष यांची सलग पाचव्या दिवशीही कसून चौकशी

ड सीबीआयकडून घटनेच्या दिवशीच्या सीसीटीव्ही फूटेजची सूक्ष्म तपासणी

ड या प्रकरणात आणखी काही संशयितांना लवकरच अटक होण्याची शक्यता

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article