सॅमसंगचा गॅलेक्सी एम17 भारतीय बाजारात दाखल
एआय फिचर्ससोबत 50 मेगापिक्सेल कॅमेरा
नवी दिल्ली : कोरियन टेक कंपनी सॅमसंगने शुक्रवारी भारतीय बाजारात एम-सिरीज अंतर्गत एक नवीन बजेट स्मार्टफोन गॅलेक्सी एम17 लाँच केला आहे. हा गॅलेक्सी एम16 चा अपग्रेडेड मॉडेल आहे. यात 5 एनएम आधारित एक्सिनोस 1330 चिपसेट, 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज, 50 एमपी कॅमेरा आणि 5000 एमएएच बॅटरी अशी वैशिष्ट्यो आहेत.
याशिवाय, अनेक अत्याधुनिक एआय फीचर्स आणि कंपनीचे नवीनतम सर्कल टू सर्च टूल उपलब्ध असेल. यासह, वापरकर्ते कोणत्याही क्रीनवर प्रदर्शित होणारा कोणताही घटक त्वरित शोधू शकतील. हे वैशिष्ट्या पूर्वी फक्त गॅलेक्सी एस-सिरीजमध्ये उपलब्ध होते, परंतु आता ते मध्यम श्रेणीच्या मोबाईलमध्ये देखील दिले आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एम 17 हा 4 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजच्या एकाच मॉडेलमध्ये लाँच करण्यात आला आहे आणि त्याची किंमत 16,499 रुपये आहे. बँक ऑफरनंतर तो फक्त 12,499 रुपयांना खरेदी करता येईल. त्याची विक्री 13 ऑक्टोबरपासून सुरू होईल. गॅलेक्सी एम 17 भारतात रेडमी नोट 14 5 जी आयक्यू झेड10 एक्स आणि रियलमी नार्झो 70 ट्यूरो या सारख्या फोनशी स्पर्धा करेल.
स्पेसिफिकेशन डिस्प्ले : फोनमध्ये 1080 ते 2340 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7-इंचाचा सुपर अमोलेड फुल एचडीसह डिस्प्ले आहे, जो 90एचझेड रिफ्रेश रेटवर काम करतो. क्रीन गोरिल्ला ग्लास व्हिक्टसने संरक्षित आहे.
कॅमेरा : बजेट फोनमध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात ओआयएस सपोर्टसह 50-मेगापिक्सेलचा मुख्य सेन्सर, 5एमपी अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2एमपी मॅक्रो लेन्स आहे.