कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सॅमसंग भारतात विस्ताराच्या तयारीत

06:47 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार शुल्काच्या माध्यमातून जगभरामधील देशांमध्ये तणावाचे वातावरण असताना या सर्वांमध्ये भारत फायदा उठवण्यासाठी पुढे येताना दिसतो आहे. दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंग आता इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या व्यवसायाची भारतात विस्ताराची योजना आखत असल्याचे समजून आले आहे.

Advertisement

सॅमसंग यांचे सर्वाधिक कारखाने व्हीएतनाम येथे आहेत. परंतु अलीकडेच व्यापार शुल्काच्या बाबतीमध्ये भारताच्या तुलनेमध्ये व्हिएतनामवर अमेरिकेने अधिक व्यापार शुल्क आकारले आहे. ज्याचा फटका आगामी काळामध्ये म्हणजे व्यापार शुल्क धोरण प्रत्यक्षात अमलात आल्यानंतर सॅमसंगला बसणार आहे. हीच बाब लक्षात घेऊन सॅमसंग आता भारतामध्ये उत्पादन कारखान्यांचा विस्तार करण्याची योजना बनवत आहे. व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर सॅमसंग भारतात येण्याचा मध्यम मार्ग स्वीकारायची तयारी करत आहे.

सॅमसंग ही कंपनी भारतामध्ये विस्तार करणारी एकमेव कंपनी नसून इतरही कंपन्या आता व्हिएतनाममधून आपला गाशा गुंडाळण्याची तयारी करत आहे.

सध्याची कामगिरी

सध्याला उत्तर प्रदेश आणि चेन्नईमधून सॅमसंग आपली उत्पादने बनवून देतो. यामध्ये स्मार्टफोनचा समावेश आहे. 2024 मध्ये सॅमसंगने 6 कोटी हँडसेटची निर्मिती केली होती. डिक्सनसोबत कंपनीची भागीदारी आहे. त्यांच्यामार्फत ही उत्पादने तयार केली जात असून सॅमसंग कंपनी भारताच्या पीएलआय योजनेचा लाभ उठवत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article