For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतात सॅमसंगने केले गॅलॅक्सी A55 आणि A 35 5G लॉन्च

03:43 PM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतात सॅमसंगने केले गॅलॅक्सी a55 आणि a 35 5g लॉन्च
Advertisement

सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रॅण्‍डने आज गॅलॅक्‍सी ए५५ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३५ ५जी च्‍या लाँचची घोषणा केली.

Advertisement

सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रॅण्‍डने आज गॅलॅक्‍सी ए५५ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३५ ५जी च्‍या लाँचची घोषणा केली. नवीन ए सिरीज डिवाईसेसमध्‍ये अनेक फ्लॅगशिप-सारखी वैशिष्‍ट्ये आहेत,जसे गोरिला ग्‍लास विक्‍टस+ प्रोटेक्‍शन, एआयद्वारे सुधारण्‍यात आलेली कॅमेरा वैशिष्‍ट्ये आणि टेम्‍पर-रेसिस्‍टण्‍ट सिक्युरिटी सोल्‍यूशन सॅमसंग नॉक्‍स वॉल्‍ट, तसेच इतर अनेक नवीन वैशिष्‍ट्ये आहेत. गॅलॅक्‍सी ए सिरीज गेल्‍या दोन वर्षांपासून भारतातील सर्वाधिक विक्री होणारा स्मार्टफोन सिरीज आहे, ज्‍यामधून भारतातील एमझेड ग्राहकांमधील या सिरीजची लोकप्रियता दिसून येते. लाँच करण्‍यात आलेले गॅलॅक्‍सी ए५५ ५जी आणि ए३५ ५जी सर्वांसाठी फ्लॅगशिप-सारखी नाविन्‍यता उपलब्‍ध आहे. गॅलॅक्‍सी ए५५ ५जी आणि ए३५ ५जी आम्‍हाला देशातील ५जी स्‍मार्टफोन विभागामधील, तसेच झपाट्याने विकसित होत असलेल्‍या मिड-प्रीमियम (३०,००० रूपये ते ५०,०००) विभागामध्ये नेतृत्‍वस्‍थान दृढ करण्‍यास साह्य करतील असे आदित्य बब्बर, उपाध्यक्ष, एमएक्स बिझनेस, सॅमसंग इंडिया म्‍हणाले. फ्लॅगशिप सारखी डिझाइन व टिकाऊपणा: पहिल्‍यांदाच गॅलॅक्‍सी ए५५ ५जी मध्‍ये मेटल फ्रेम आणि गॅलॅक्‍सी ए३५ ५जी मध्‍ये मागील बाजूस प्रीमिअम ग्‍लॉसची भर करण्यात आली आहे. ऑसम लिलॅक, ऑसम आइस ब्‍ल्‍यू आणि ऑसम नेव्‍ही या तीन आकर्षक रंगांमध्‍ये उपलब्‍ध असलेले हे स्‍मार्टफोन्‍स आयपी६७ प्रमाणित आहेत, म्‍हणजेच ते १ मीटर फ्रेश वॉटरमध्‍ये जवळपास ३० मिनिटे टिकून राहू शकतात. तसेच, हे डिवाईसेस धूळ व वाळूला विरोध करण्‍यासाठी निर्माण करण्‍यात आले आहेत.

६.६ इंच एफएचडी+ सुपर एएमओएलईडी डिस्‍प्‍ले आणि किमान बेझल्‍ससह १२० हर्टझ रिफ्रेश रेट अत्‍यंत सुलभ कार्यक्षमता देते. या स्‍मार्टफोन्‍सच्‍या पुढील व मागील बाजूस कॉर्निंग गोरिला ग्‍लास विक्‍टस+ संरक्षणासह फ्लॅगशिप सारखा टिकाऊपणा आहे. फ्लॅगशिप सारखे कॅमेरा इनोव्‍हेशन्‍स: या नवीन ए सिरीज स्‍मार्टफोन्‍समध्‍ये विविध नाविन्‍यपूर्ण एआय सुधारित कॅमेरा वैशिष्‍ट्ये आहेत, जे वापरकर्त्‍याच्‍या कन्‍टेन्‍ट गेमला नव्‍या उंचीवर नेतात. ही वैशिष्‍ट्ये आहेत फोटो रिमास्‍टर, इमेज क्लिपर आणि ऑब्‍जेक्‍ट इरेजरसह इतर अनेक. गॅलॅक्‍सी ए५५ ५जी आणि ए३५ ५जी मध्‍ये ५०० मेगापिक्‍सल ट्रिपल कॅमेरासह एआय इमेज सिग्‍नल प्रोसेसिंग (आयएसपी) द्वारे सुधारित नाइटोग्राफी आहे, जे ए-सिरीजमध्‍ये अंधुक प्रकाशात देखील सुस्‍पष्‍ट व आकर्षक फोटोज कॅप्‍चर होण्‍याची खात्री देते. फ्लॅगपिश स्‍तरीय सुरक्षितता: सॅमसंग नॉक्‍स वॉल्‍ट सिक्‍युरिटी पहिल्‍यांदाच ए-सिरीजमध्‍ये येते, ज्‍यामुळे फ्लॅगशिप स्‍तरीय सुरक्षितता अधिकाधिक व्‍यक्‍तींना उपलब्‍ध होते. हार्डवेअर आधारित सिक्‍युरिटी सिस्‍टम हार्डवेअर व सॉफ्टवेअर हल्‍ल्‍यांपासून सर्वसमावेशक संरक्षण देते. यामुळे डिवाईसमधील सर्वात महत्त्वपूर्ण डेटासह लॉक स्क्रिन क्रेडेन्शियल्‍स जसे पिन कोड्स, पासवर्डस् आणि पॅटर्न्‍सचे संरक्षण होते.

Advertisement

आतापर्यंतची सर्वोत्तम कार्यक्षमता: ४ एनएम प्रोसेस तंत्रज्ञानावर निर्माण करण्‍यात आलेले नवीन एक्झिनॉस १४८० प्रोसेसर गॅलॅक्‍सी ए५५ ५जीला शक्‍ती देते, तर गॅलॅक्‍सी ए३५ ५जी ५ एनएम प्रोसेस तंत्रज्ञानावर निर्माण करण्‍यात आलेल्‍या एक्झिनॉस १३८० प्रोसेसरसह अपग्रेड करण्‍यात आला आहे. हे पॉवर-पॅक स्‍मार्टफोन्‍स विविध एनपीयू, जीपीयू व सीपीयू अपग्रेड्ससह ७० टक्‍क्‍यांहून अधिक मोठ्या कूलिंग चेम्‍बरसह येतात, ज्‍यामधून गेम असो किंवा मल्‍टी-टास्‍क असो सुलभ आऊटपुटची खात्री मिळते. या सर्वोत्तम सुधारणांसह गॅलॅक्‍सी ए५५ ५जी मध्‍ये भर करण्यात आलेली १२ जीबी रॅम या डिवाईसला या किंमत विभागामधील गेम चेंजर बनवते. गॅलॅक्‍सी ए५५ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३५ ५जी ग्राहकांना सॅमसंग वॉलेट मिळेल, जे मोबाइल वॉलेट सोल्‍यूशन आहे आणि तुम्‍हाला गॅलॅक्‍सी डिवाईसमध्‍ये महत्त्वाच्‍या गोष्‍टी सोईस्‍करपणे व सुरक्षितपणे वाहून नेण्‍यास मदत करते. यामध्‍ये तुमचे पेमेंट कार्डस्, डिजिटल आयडी, प्रवास तिकिटे अशा बाबींची भर करा. या डिवाईसेसमध्‍ये अत्‍यंत लोकप्रिय वॉईस फोकस वैशिष्‍ट्य आहे, जे वापरकर्त्‍यांना विशाल आवाजाबाबत चिंता न करता कॉल्‍स करण्‍याची व प्राप्‍त करण्‍याची सुविधा देते. गॅलॅक्‍सी ए५५ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३५ ५जी सह सॅमसंग अँड्रॉईड ओएसचे जवळपास चार जनरेशन्‍स आणि पाच वर्षांचे सिक्‍युरिटी अपडेट्स देईल, ज्‍यामुळे त्‍यांना नवीन गॅलॅक्‍सी आणि अँड्रॉईड वैशिष्‍ट्यांसह सुसज्‍ज करत डिवाईसेसचे जीवनचक्र ऑप्टिमाइज होईल.

मेमरी व्‍हेरिएण्‍ट्स, किंमत, उपलब्‍धता आणि ऑफर्स

  • Product Storage Variant Price
  • Galaxy A55 5G 8GB+128GB INR 36999
  • 8GB+256GB INR 39999
  • 12GB+256GB INR 42999
  • Galaxy A35 5G 8GB+128GB INR 27999
  • 8GB+256GB INR 30999

इतर ऑफर्स

  • सॅमसंग वॉलेट: पहिल्‍या यशस्वी टॅप अँड पे व्‍यवहारावर २५० रूपयांचा अॅमेझॉन वाऊचर मिळवा.
  • यूट्यूब प्रीमियम: २ महिने मोफत (१ एप्रिल २०२५ पर्यंत)
  • मायक्रोसॉफ्ट ३६५: मायक्रोसॉफ्ट ३६५ बेसिक + ६ महिन्‍यांचे क्‍लाऊड स्‍टोरेज (जवळपास १०० जीबीपर्यंत, ऑफर रिडम्‍प्‍शन ३० जून २०२४ पर्यंत करता येऊ शकते)
  • गॅलॅक्‍सी ए५५ ५जी आणि गॅलॅक्‍सी ए३५ ५जी खरेदीसाठी सॅमसंग एक्‍सक्‍लुसिव्‍ह व पार्टनर स्‍टोअर्स, Samsung.com आणि इतर ऑनलाइन प्‍लॅटफॉर्म्‍सवर उपलब्‍ध आहेत.
Advertisement
Tags :

.