For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सॅमसंग गॅलेक्सी एस25 आवृत्ती लाँच

07:00 AM Jan 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
सॅमसंग गॅलेक्सी एस25 आवृत्ती लाँच
Advertisement

डेटा सुरक्षेसाठी ऑटो ब्लॉकर :  किंमत 80,999 पासून होणार सुरु

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

दक्षिण कोरियाची टेक कंपनी सॅमसंगने त्यांची सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन सीरीज गॅलेक्सी एस25 हा सादर केला आहे. यामध्ये गॅलेक्सी एस25 अल्ट्रा, गॅलेक्सी एस25 प्लस आणि गॅलेक्सी एस25 समाविष्ट आहेत. त्यांच्या किमती 80,999 पासून सुरू होतात ज्या 1,65,999 पर्यंत जातात. तिन्ही स्मार्टफोनची प्री-बुकिंग सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच विक्री 7 फेब्रुवारीपासून सुरू  होणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

Advertisement

नाईट फोटोग्राफीसाठी नाईटग्राफी सारखी अनेक एआय फीचर्स

कंपनीने बुधवारी रात्री (23 जानेवारी) अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरातील सॅन होजे एसएपी सेंटरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला आर्मर 2 डिस्प्ले ग्लास आणि रात्रीच्या फोटोग्राफीसाठी नवीन एआय फीचर, नाईटग्राफी असलेले हे तिन्ही स्मार्टफोन लाँच केले आहेत. याशिवाय, ए24 मालिकेतील फोनमध्ये नोट असिस्ट, चॅट असिस्ट, रिअल-टाइम लँग्वेज ट्रान्सलेशन, सर्कल टू सर्च असे अनेक प्रगत एआय फीचर्स देखील मिळतील. ए25 मालिकेतील स्मार्टफोनना 2032 पर्यंत सॉफ्टवेअर सिक्युरिटी अपडेट्स मिळतील.

ऑटो ब्लॉकर

ए25 स्मार्टफोन सिरीजमध्ये स्मार्टफोनच्या सुरक्षेसाठी ‘ऑटो ब्लॉकर‘ नावाचे एआय फिचर्स आहे. ते चालू केल्यानंतर, जर फोनमध्ये युएसबी केबल प्लग केली तर फोन फक्त चार्ज होईल. म्हणजेच, फोनमधून कोणताही डेटा कोणत्याही प्रकारे घेतला जाऊ शकत नाही. इतकेच नाही तर, हे फीचर फोनला गुगल प्ले स्टोअर आणि सॅमसंग स्टोअरवर उपलब्ध असलेल्या अॅप्स व्यतिरिक्त इतर कोणतेही थर्डपार्टी अॅप्स डाउनलोड करण्याची परवानगी देणार नाही. जर, कोणताही थर्डपार्टी अॅप प्रथम फोन अपडेट करणार नाही. विशेष म्हणजे जर हॅकर तुमच्यासोबत टेक्स्ट मेसेजमधील लिंक शेअर करत असेल, तर हे फीचर मेसेज ओळखतो आणि ब्लॉक करतो, म्हणजेच मेसेज उघडला जाणार नाही आदींचे फिचर्स कंपनीने दिले आहेत.

Advertisement
Tags :

.