सॅमसंग गॅलेक्सी एस 24 आवृत्ती लाँच
एआय सुविधांसोबत होणार उपलब्ध : 80,000 पासून किंमत सुऊ : 200 एमपी कॅमेरा
वृत्तसंस्था /कॅलिफोर्निया
दक्षिण कोरियाची टेक कंपनी सॅमसंगने आपला सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन गॅलेक्सी एस24 ची आवृत्ती बाजारात सादर केली आहे. यामध्ये गॅलेक्सी एस24 अल्ट्रा, गॅलेक्सी एस24 प्लस आणि गॅलेक्सी एस24 यांचा यामध्ये समावेश राहणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. सदर स्मार्टफोनची किंमत ही 80,000 पासून सुऊ होत असून ती 1,59,999 पर्यंत राहणार आहे. तिन्ही स्मार्टफोनचे प्री बुकिंग सुऊ झाले असून लवकरच विक्री सुऊ होणार आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरातील सॅन जोस एसएपी सेंटर येथे गुऊवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कंपनीने नोट असिस्ट, चॅट असिस्ट, रिअल टाइम लँग्वेज ट्रान्सलेशन, सर्कल टू सर्च यासारख्या प्रगत अनेक एआय वैशिष्ट्यांसह तीन स्मार्टफोन ग्राहकांच्या भेटीला बाजारात आणले आहेत.
अन्य फिचर्स :
- एस 24 मालिका स्मार्टफोन्सना 7 वर्षांसाठी सॉफ्टवेअर सुरक्षेसोबत मिळणार
- गॅलेक्सी एस 24 मालिकेत फोटो असिस्ट फिचर
- एआय जनरेटेड एडिटिंग टूलच्या मदतीने फोटोतील कोणतीही वस्तू काढता येईल किंवा हलविता येईल
- यासोबतच अन्य अत्याधुनिक सुविधा उपलब्ध कऊन दिल्या आहेत.