‘सॅमसंग गॅलेक्सी एफ 55’ भारतीय बाजारात सादर
सदरचा स्मार्टफोन 5 जीमध्ये होणार उपलब्ध : 50 एमपी प्रंट कॅमेरा किंमत 24,999 पासून राहणार सुरु
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरियन टेक कंपनी सॅमसंगने 27 मे रोजी भारतीय बाजारात आपला मध्यम रेंजमधील सॅमसंग गॅलेक्सी एफ 55 हा स्मार्टफोन सादर केला आहे. लेदर स्टिच केलेला बॅक पॅनेल असलेला हा कंपनीचा भारतातील पहिला फोन आहे. याशिवाय मोबाईलमध्ये 6.7 इंच सुपर डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेट, 50 मेगापिक्सल प्रंट कॅमेरा, 5000 एमएएच बॅटरी, 45 फास्ट चार्जिंग यासारखी वैशिष्ट्यो आहेत.
किंमत आणि उपलब्धता लक्षात घेतल्यास भारतीय बाजारात तीन स्टोरेजसह पर्यायासह नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. याची सुरुवातीची किंमत 26,999 रुपये आहे. यासोबतच 128 जीबी, 265 जीबी आदी स्टोरेज उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. अंतर्गत रेसिन ब्लॅक आणि अॅप्रिकॉट क्रश कलरमध्ये मोबाईल उपलब्ध होणार आहे. संबंधीत फोनच्या काही डिव्हाईसवर 2,000 रुपयांची सवलत मिळणार असल्याची माहिती आहे. प्रोसेसरचा विचार केल्यास क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7जन 1 चिपसेट मिळणार आहे. यामुळे गेमिंग दरम्यान चांगला वेग
मिळणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.