कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सॅमसंग गॅलेक्सी एफ16 भारतात लाँच

06:24 AM Mar 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

50 एमपी कॅमेऱ्यासह 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दक्षिण कोरियाची टेक क्षेत्रातील दिग्गज कंपनी सॅमसंग यांनी भारतात आपला नवीन सॅमसंग गॅलेक्सी एफ16 हा 5-जी नेटवर्कमधील स्मार्टफोन सादर केला आहे. सदरचा स्मार्टफोन हा परवडणाऱ्या किंमतीत प्रीमियम फिचर्ससोबत सादर करण्यात आल्याचा दावा कंपनीने यावेळी केला आहे. यामध्ये प्रामुख्याने 6.7 इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले, 50 एमपी मुख्य कॅमेरा आणि 5 जी कनेक्टिव्हिटीसह अन्य फिचर्सही देण्यात आली आहेत. हा स्मार्टफोन 13 मार्च 2025 पासून खरेदीसाठी ग्राहकांना उपलब्ध झाला आहे.

मुख्य फिचर्स

कॅमेरा आणि बॅटरी : यामध्ये 5,000 एमएएच क्षमता असणारी बॅटरी देण्यात आली आहे, जी पूर्ण दिवसाचा बॅकअप देणार आहे. 25 डब्लू फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे, ज्यामुळे बॅटरी लवकर चार्ज करणे सोपे होणार आहे. कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाल्यास हा स्मार्टफोन आता ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येणार आहे. यात 50 एमपी प्रायमरी सेन्सर, 5 एमपी अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2 एमपी मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. रॅम : हा फोन आता 4 जीबी आणि 8 जीबी रॅम या पर्यायांमध्ये उपलब्ध होणार आहे, ज्यामध्ये 128 जीबी अंतर्गत स्टोरेज राहणार आहे. स्टोरेज वाढविण्यासाठी आवश्यकतेनुसार मायक्रोएसडी कार्डचा वापर करता येऊ शकतो.

सॉफ्टवेअर आणि सुरक्षा वैशिष्ट्यो

गॅलेक्सी एफ16 5जी मध्ये वन यूआय 6.0 येतो, जो अँड्रॉइड 14 वर आधारित आहे. कंपनीने या डिव्हाइससाठी 6 वर्षांचे सुरक्षा अपडेट आणि 6 प्रमुख ओएस अपडेट देण्याचे आश्वासन दिले आहे. सुरक्षेसाठी यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे. गॅलेक्सी एफ16 5जीची सुरुवातीची किंमत 11,499 रुपये ठेवण्यात आली आहे, यात 4 जीबी रॅम 128 जीबी स्टोरेजची सोय आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article