कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नोटीसवर सॅमसंगचा नाराजीचा सूर

07:00 AM May 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नोटीस रद्द करण्याची कंपनीची भारतीय न्यायाधिकरणाकडे मागणी

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

सॅमसंग नेटवर्किंग उपकरणांच्या आयातीच्या चुकीच्या वर्गीकरणावर जारी केलेली कर मागणी नोटीस रद्द करण्याची विनंती सॅमसंगने भारतीय न्यायाधिकरणाकडे केली आहे. सरकारने कंपनीकडून 52 कोटी रुपयांचा कर मागितला आहे. कंपनीने असा युक्तिवाद केला की अधिकाऱ्यांना या प्रणालीची माहिती होती, कारण भारतातील रिलायन्स कंपनी वर्षानुवर्षे अशाच प्रकारे अशा उपकरणांची आयात करत होती, असे दस्तऐवजात दिसून येते. भारताच्या कर मागणीला आव्हान देणारी सॅमसंग अलीकडच्या काही महिन्यांत दुसरी मोठी विदेशी कंपनी बनली आहे.

आयात केलेल्या भागांच्या चुकीच्या वर्गीकरणाच्या प्रकरणात केलेल्या कर मागण्यांविरुद्ध फोक्सवॅगनने मोदी सरकारवर 1.4 अब्ज डॉलर्सचा दावा दाखल केला आहे. जानेवारीमध्ये कर अधिकाऱ्यांनी एका प्रमुख मोबाइल टॉवर डिव्हाइसचे चुकीचे वर्गीकरण करून 10-20 टक्के आयात शुल्क टाळण्यासाठी सॅमसंगला 520 दशलक्ष डॉलर्स देण्यास सांगितले. सॅमसंगचे प्रकरण ‘रिमोट रेडिओ हेड’ नावाच्या एका विशेष उपकरणाच्या आयातीशी संबंधित आहे, जे एका लहान बाह्य मॉड्यूलमध्ये बसवलेले रेडिओ-फ्रिक्वेन्सी सर्किट आहे. कर अधिकाऱ्यांच्या मते, ते 4 जी टेलिकॉम सिस्टीममधील ‘सर्वात महत्त्वाचे’ उपकरणांपैकी एक आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article