महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट
Advertisement

संभाजीनगरकरांच्या उरावर फक्त 'रझाकार'च नाहीत, तर आधुनिक 'सजा'कारही

12:10 PM Sep 17, 2022 IST | Abhijeet Khandekar
The opposition never wins; The ruling party is losing

ऑनलाईन टीम / तरुण भारत : 

Advertisement

Raj Thackeray letter on marathwada muktisangram din मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या दिवसाचं औचित्य साधत महाराष्ट्रातील जनतेला उद्देशून खुलं पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी संभाजीनगरकरांच्या उरावर फक्त 'रझाकार'च नाहीत, तर आधुनिक 'सजा'कारही आहेत. मनसे लवकरच त्यांचा बंदोबस्त करेल, असं म्हटले आहे.

राज ठाकरेंनी पत्रात म्हटलं आहे की, आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन. मराठवाडा मुक्तीसंग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. हैद्राबादच्या निजामाचा हेतू साध्य झाला असता, तर भारताचं अखंडत्वच धोक्यात आलं असतं. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे, आणि म्हणून हा खरं तर आजचा दिवस, एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे.

मला नेहमी वाटतं की इतक्या मोठ्या लढ्याबाबत आपल्याकडे बऱ्यापैकी अनभिज्ञता आहे. मला अनंत भालेरावांचं या विषयावरचं पुस्तक वाचून लढ्याबद्दल काही गोष्टी कळल्या. मग पुढे नरहर कुरुंदकरांची या विषयावरची काही व्याख्यानं यूट्युबवर ऐकताना नवीन माहिती मिळत राहिली. पण एकूणच असं वाटतं की या इतक्या गौरवशाली लढ्याबद्दल फारसं कुणाला माहित नाही.

माझं म्हणणं आहे की, आता जे नवं शिक्षण धोरण येत आहे. त्यानुसार त्या त्या राज्यातील पुसून टाकला गेलेला इतिहास शिकवला जाणार आहे. त्यामुळं मराठवाडा मुक्ती संग्रामाचा विस्तृत इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवला गेला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा हे महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने कदापि विसरता कामा नये. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास शाळेत शिकवा, अशी मागणी देखील राज ठाकरे यांनी केली आहे. 

मराठवाडा मुक्तिसंग्रामाविषयी फारसं का बोललं जात नसेल? अर्थात रझाकारांचं लांगुलचालन करण्यात धन्यता मानणाऱ्यांचं सरकार कित्येक वर्ष राज्यात होतं. त्यामुळं हे होणं स्वाभाविक होतं. पण सध्या याच रझाकारांची पुढची औलाद मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सोहळ्यात सामील व्हायला नकार देते आणि दुर्दैव असं की माझ्या संभाजीनगरकरांच्या उरावर ही असली घाण येऊन बसली आहे.

संभाजीनगरकरांच्या उरावर फक्त रझाकारच नाहीत तर आधुनिक 'सजा'कार पण येऊन बसलेत. गेली कित्येक वर्ष संभाजीनगरच्या महापालिकेत खुर्चीत बसून लूट करणारे आणि रोज संभाजीनगरकरांना शिक्षा भोगायला लावणारे 'सजा'कार. अर्थात लवकरच मनसे रझाकार आणि सजाकार या दोघांचा बंदोबस्त करेल, असा इशारा देत राज ठाकरे यांनी मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Advertisement
Next Article