महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सांबरा महालक्ष्मी यात्रेला उद्यापासून प्रारंभ

11:06 AM May 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तीन पर्यायी रस्त्यांची निर्मिती : भाविकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याचे आवाहन

Advertisement

वार्ताहर /सांबरा

Advertisement

सांबरा येथे मंगळवार दि. 14 मे पासून श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. यात्राकाळात बेळगाव-सांबरा रस्त्यावर होणारी गर्दी लक्षात घेऊन यात्रा कमिटीने अन्य तीन पर्यायी रस्त्यांची निर्मिती केली आहे. भाविकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजू देसाई यांनी केले आहे. येथे अठरा वर्षांनंतर होत असलेल्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेत भाविकांचा जनसागर लोटणार आहे. त्यामुळे बेळगाव-सांबरा रस्त्यावर मोठा ताण पडणार आहे. तो कमी करून वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी यात्रा कमिटीने तीन पर्यायी रस्त्यांची निर्मिती केली आहे. मुतगे ते सांबरा, अष्टे ते सांबरा, बाळेकुंद्री खुर्द ते सांबरा या रस्त्यांचा वापर करून भाविक सांबरा गाठू शकतात. तसेच बसरीकट्टी ते सांबरा या संपर्क रस्त्याचाही भाविक वापर करू शकतात. त्या त्या भागातील भाविकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या अनेक स्टॉल, पाळणे व मनोरंजनाचे विविध साहित्य दाखल झाले आहे. मुख्य मार्गाच्या शेजारी पाळणे जोडण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

यात्रा काळात चोख पोलीस बंदोबस्त

यात्रा काळात मारिहाळ पोलिसांमार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असून यात्रा कमिटीच्यावतीने बाऊन्सर्सही नेमण्यात येणार आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article