For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आचरा येथील दांडिया स्पर्धेत समर्थ ग्रुप कुणकेश्वर, प्रथम

02:26 PM Oct 06, 2024 IST | अनुजा कुडतरकर
आचरा येथील दांडिया स्पर्धेत समर्थ ग्रुप कुणकेश्वर  प्रथम
Advertisement

आचरा प्रतिनिधी

Advertisement

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे चौघडयावरचा गणपती आचऱ्याचा विघ्नहर्ता गणेशोत्सवानिमित्ताने श्री बाळगोपाळ मंडळ आचरा वरचीचावडी आयोजित जिल्हास्तरीय भव्य दांडिया स्पर्धेत प्रथम क्रमांक समर्थ गृप कुणकेश्वर यांनी मिळविला. द्रुतीय नवदुर्गा गृप किंजवडे,तर तृतीय आचरा पिरावाडी यांनी मिळविला.उत्तेजनार्थ सिद्धिविनायक ग्रुप नांदगाव,कुणकेश्वर पावणाई गृप,वेंगुर्ला,नाडण गृप देवगड यांना उत्तेजनार्थ गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण मनस्वी कुबल सागर सारंग यांनी केले. स्पर्धेचे बक्षिस वितरण देवस्थान सचिव संतोष मिराशी, जयप्रकाश परुळेकर मंडळाचे अध्यक्ष विलास आचरेकर, उपाध्यक्ष किशोर आचरेकर यांच्या हस्ते केले गेले. यावेळी वामन आचरेकर,बबन शेट्ये, ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर, महेश शटये,रामदास आचरेकर, मंदार आचरेकर, विजय कदम यांसह बहुसंख्य बालगोपाळ मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते.सूत्रसंचलन राजेश भिरवंडेकर आणि राजा सामंत यांनी केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.