महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विधानसभा निवडणुकीत समरजीत घाटगेंना विजयी करूया : जयवंतराव शिंपी

06:40 PM Sep 10, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

आजऱ्यात शिंपी गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा
आजरा प्रतिनिधी
गेली 20-25 वर्षे तालुक्यातील सर्वसामान्य माणसं जोडण्याचं काम आपण करत आहोत. समरजितसिंह घाटगे देखील कोणतेही संविधानिक पद नसताना शाश्वत विकासकामांचा अजेंडा गावोगावी राबवत आहेत. त्यांच्याकडे सर्वसामान्यांच्या अपेक्षा ओळखण्याची चिकित्सक वृत्ती चांगली आहे. त्यामुळे तालुक्यातील स्वाभिमानी जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी निवडणुकीत राजे समरजितसिंह घाटगे यांच्या विजयासाठी सर्वच कार्यकर्ते ही सर्वांच्या स्वाभिमानाची आणि हक्काची लढाई नक्की जिंकतील, असा विश्वास आजरा कारखान्याचे माजी अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी व्यक्त केला.

Advertisement

आजरा येथील शिंपी गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी समरजितसिंह घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविकात अभिषेक शिंपी म्हणाले, समरजितसिंह घाटगे यांनी पुरोगामीत्वाचे वलय लाभलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात केलेला प्रवेश हा जनतेच्या मनातील आहे. या प्रवेशाने त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून शाहूंच्या विचारांना बळकटी देण्याचे काम केलं आहे. निवडणुकीत तालुक्यातील जनता समरजितसिंह घाटगे यांना निवडून देण्यासाठी त्यांची हमखास पाठराखण करेल, असे त्यांनी सांगितले. शिंपी म्हणाले, समरजितसिंह घाटगे उच्चविद्याविभूषित नेतृत्व आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाणीव त्यांना चांगली आहे. समरजितसिंह घाटगे यांना निवडून देऊया, असे आवाहन त्यांनी केले.

Advertisement

यावेळी राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, शाहू ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष स्व. विक्रमसिंह घाटगे यांच्या शिकवणीप्रमाणे, मतांमध्ये नको तर माणसांमध्ये गुंतवणूक करा. माणूसपण जोडण्याचं आणि जपण्याचं त्यांनी दिलेले बाळकडू आम्ही तंतोतंत कृतीतून पाळत आहोत. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. हा परिसर विकासाबाबत उपेक्षित राहिला असला तरी येत्या काळात परिसराच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपण नक्की प्रयत्नशील राहू. त्यामुळे निवडणुकीत आपला लोकसेवक म्हणून सर्वांचीच सेवा करण्याची संधी द्या, असे आवाहन केले.

जनार्दन निऊंगरे अॅड. धनंजय देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. सुनील देसाई यांनी मानले. यावेळी माजी सभापती भिकाजी गुरव, के. जी. पटेकर, एस. पी. कांबळे, विलास पाटील, सदाशिव डेळेकर, गणपतराव नाईक, डी. एम. पाटील, बाबाजी नाईक, सुनील शिंदे यांच्यासह कागल विधानसभा मतदारसंघातील या परिसरातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#samarjit ghatgeJaywantrao Shimpivictorious assembly elections
Next Article