समरजीतसिंह घाटगे यांनी सपत्नीक नोंदवला मतदानाचा हक्क
कोल्हापूर :
महाविकास आघाडीचे उमेदवार समरजीतसिंह घाटगे यांनी शिंदेवाडी तालुका कागल येथील बुथ क्रमांक १६९ वर सकाळी ७ वाजून ४१मिनिटांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यासोबत पत्नी सौ.नवोदिता घाटगे यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी घाटगे म्हणाले. आज आम्ही सर्वांनी कागल- गडहिंग्लज- उत्तूर च्या परिवर्तनासाठी मतदान केलेले आहे. मी याठिकाणी या मतदारसंघातील माझे कुटुंब सदस्य आहेत, त्यांनी आपल्या परिवर्तनासाठी घरातून बाहेर पडून मोठ्या संख्येने मतदान करावे असे मी सांगतो. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधाना अंतर्गत आपल्या मतदानाचा जो हक्क दिला आहे, त्याचा पुरेपूर वापर करून परिवर्तनासाठी मतदान करा. कोणत्याही धमक्यांना, दडपशाहीला घाबरू नका. आम्ही आपल्या पाठीशी आहोत. आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आपल्याला ही सत्ता मिळवायची आहे. कारण ही आपली सत्ता आहे.
सर्वांनी एकच टारगेट ठेवा. जास्तीत जास्त नागरिक मतदानाला बाहेर येऊन हे परिवर्तन घडवूया. मला खात्री आहे की, हा गुलाल या परिवर्तनावर पडणार आहे, याचा मला ठाम विश्वास आहे.