समरदीप सिंग गिलला गोळाफेकचे सुवर्ण
वृत्तसंस्था/जयपूर
समरदीप सिंग गिलने गुरूवारी येथे झालेल्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये पुरूषांच्या गोळाफेकमध्ये ऑल इंडिया युनिव्हर्सिटीच्या (एआययू) स्वताचाच विक्रम मागे टाकला तर ईशा चंदर प्रकाश (महिला हेप्टाथ्लॉन) आणि पुरूषांच्या 4×100 मी. रिले संघाने नवे स्पर्धाविक्रम नोंदवले. यावर्षी दोनवेळचा आशियाई गेम्स चॅम्पियन तजिंदरपाल सिंग तूरला तीनदा हरवणाऱ्या समरदीपने सुवर्णपदक जिंकण्याच्या दुसऱ्या प्रयत्नात 19.42 मी. अंतरापर्यंत शॉटपुट फेकले. तर गुरू काशी युनिव्हर्सिटीचा दुसऱ्या क्रमांकाचा फिनिशर अनिकेत फक्त 18.8 मी. अंतर नोंदवता आले. समरदीप या वर्षी अपवादात्मक फॉर्ममध्ये आहे आणि त्याने जयपूरमध्ये सातत्याने 19 मी. पेक्षा जास्त गोळाफेक केली आहे. समरदीपची सहकारी ईशा चंदर प्रकाशने हेप्टाथ्लॉनमध्ये 4857 गुणांसह केआयूजी विक्रम मोडला. बुधवारी पहिल्या चार स्पर्धांनंतर ईशाने तिच्या प्रतिस्पर्ध्यांवर मोठी आघाडी घेतली होती आणि गुरूवारीही तिने मागील विक्रमात 109 गुणांची भर घालत नवा विक्रम केला.