कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अनुपमासोबत झळकणार समांथा

06:47 AM Apr 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लवकरच अभिनेत्री समांथा रुथ प्रभू ही अनुपमा परमेश्वरनसोबत ‘परधा’ या दक्षिण भारतीय चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटात समांथा ही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण कंदरेगुला करत आहेत. परधा चित्रपटात अनुपमा परमेश्वरन मुख्य भूमिकेत आहे, परंतु चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये समांथाची व्यक्तिरेखा असणार आहे. परधा चित्रपटापूर्वी समांथा आणि अनुपमाने ‘ए....आ..’ या चित्रपटात एकत्र काम केले होते.

Advertisement

Advertisement

समांथाचे नाव सध्या दिग्दर्शक राज निदिमोरुसोबत जोडले जात आहे. दोघेही डेट करत असल्याची चर्चा सुरू आहे. राज निदिमोरुसोबत समांथाने ‘सिटाडेल : हनीबनी’मध्ये काम केले होते. राज या सीरिजशी निर्माता म्हणून जोडला गेला होता, तर समांथाने यात अभिनय केला होता. समांथा आता निर्माती म्हणून देखील सक्रीय आहे. अभिनेत्रीने स्वत:चे प्रॉडक्शन हाउस सुरू केले आहे. तसेच तिने एका चित्रपटाची निर्मितीही सुरु केली आहे. याचबरोबर ती काही बिगबजेट चित्रपटांमध्ये काम करत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article